आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बलवाडी ता. रावेर येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष...प्रमुख मार्गदर्शक.... म्हणून यशस्तंभ अकॅडमीचे संचालक...., शाळेचे माजी विद्यार्थी तथा ॲड. विलास तायडे सर विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. [ads id="ads1"]
कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना वाचन, लेखन, आरोग्य, पर्यावरण, विविध गीते, बोधकथा सांगून श्री. तायडे सरांनी विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले...बोलत असताना वाचनाने माणूस समृध्द होतो....हा मौलिक सल्ला सरांनी दिला....प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पाटील यांनी स्वागत केले .... तर सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. अरविंद पाटील सर यांनी केले..तर आभार श्री. एकनाथ चौधरी यांनी मांडले....शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते...कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.