माता रमाई या बाबासाहेबांच्या खंबीर आधार स्तम्भ होत्या - डॉ. नरेंद्र मुळे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



ऐनपुर प्रतिनिधी:-  विजय एस अवसरमल

ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने सर तर प्रमुख वक्ते डॉ. नरेंद्र मुळे हे लाभले होते. त्यांनी माता रमाई यांचे पूर्व चरित्र सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कशाप्रकारे साथ दिली व सहकार्य केलं याची माहिती दिली.  [ads id="ads1"] 

  आजच्या युवतींनी आणि स्त्रियांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या चरित्राचा अभ्यास करावा असे त्यांनी विषद केले. यानंतर मराठी विभाग प्रमुख डॉ. रेखा पाटील यांनीही माता रमाई यांच्या संघर्ष आयुष्याची माहिती दिली. तसेच अर्थशास्त्र विभाग प्रमूख डॉ. नीता वाणी यांनी माता रमाई यांच्या जीवनाविषयी माहिती देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता असे प्रतिपादित केले. [ads id="ads2"] 

  अध्यक्षीय भाषणात डॉ. प्राचार्य डॉक्टर जे बी अंजने सरांनी माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील अनुभव सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रदीप तायडे व आभार प्रा. अक्षय महाजन सरांनी केले. कार्यक्रमाला प्रा. आर .व्ही. भोळे, प्रा. डॉ. महेंद्र सोनवणे, डॉ. वैष्णव सर, प्रा. मिलिंद भोपे प्रा. कल्पना सुतार,  प्रा. संजना पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजार होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!