यावल ( सुरेश पाटील ) आज रविवार दि.१८ रोजी संध्याकाळी जळगाव येथील एलसीबी पथकाने यावल तालुक्यातील डाभूर्णी येथे अचानक धाड टाकून संशयित आरोपीच्या ताब्यातून मोठी रक्कम हस्तगत केल्याची जोरदार चर्चा यावल तालुक्यात सुरू आहे एलसीबीची कारवाई महत्त्वाची असली तरी याबाबत एलसीबी कडे तसेच यावल पोलिसात कोणतेही नोंद झालेली नाही आणि प्रसिद्धी माध्यमांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की जिल्ह्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत,या गुन्ह्यांचा तपास चौकशी सुरू असताना त्या पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी आपल्या पथकाच्या माध्यमातून नियोजनबद्ध सापळा रचून डाभूर्णी गावात एका संशयी ताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून फार मोठी रक्कम हस्तगत केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे,सदरची रक्कम नेमकी कोणत्या गुन्ह्यातील आहे याबाबतची सविस्तर माहिती एलसीबी पथकाकडून चौकशी अंति मिळणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.[ads id="ads2"]
एलसीबी पथक डाभूर्णी गावात चौकशी व तपास कामी डाभूर्णी गावात दाखल होतात ग्रामस्थांसह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली,कारवाई मात्र नेमकी कोणत्या गुन्ह्याबाबत आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात दरोडा रस्ता लूट झाल्याने त्या गुन्ह्याचा संबंध असल्याचे बोलले जात असून काहींनी वेगवेगळ्या विषयासंदर्भात चर्चा सुरू केल्या आहेत. परंतु एलसीबी पथकाच्या संपूर्ण कारवाई चौकशीअंति वस्तुस्थिती समोर आल्याशिवाय राहणार नाही एवढे निश्चित.