यावल ( सुरेश पाटील )
आज सोमवार दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तचा महोत्सव यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील महिला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.[ads id="ads1"]
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे नियोजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.[ads id="ads2"]
प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.