सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- यावल तालुक्यातील फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ३२ गाव असून येथे दारु,सट्टा मटका,जुगार अड्डे, अवैधरित्या रात्रीबेरात्री रेतीची तस्करी सह विमल गुटखेची खुलेआम विक्री कायद्याचे कोणतेच धाक न बाळगता सर्रासपणे सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ पुर्णपणे बंद व्हावे.अशी रास्त मागणी उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर यांना निवेदनाद्वारे माजी नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम फैजपूर यांनी दि.२१ फेब्रुवारी रोजी केली आहे. [ads id="ads1"]
तसेच या निवेदनात म्हटले आहे की,सदरील अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीसांचे अजिबात धाकच उरलेला नाही.शाळा, कॉलेजेस,धार्मिक स्थळे तसेच प्रतिक्षित लोकांची घरे अशा ये-जा करणारे विद्यार्थ्यांमध्ये याचे वाईट परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश राज्यातून विमल गुटख्याच्या गाड्या सर्रासपणे येत असून याची भाजीपाल्यासारखी विक्री देखील सुरू आहे. याबाबत वेळोवेळी विनंती करून सांगितल्यावर सुद्धा हे धंदे बंद केले जात नाही. [ads id="ads2"]
म्हणून येत्या ३ मार्च पर्यंत सदरील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद न झाल्यास या संदर्भात थेट दी.४ मार्च पासून,फैजपूर प्रांत कार्यालय समोर बेमुदत उपोषणाला बसल्याचा इशारा माजी नगरसेवक शेख कुर्बान यांनी फैजपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे.
.


