रावेर येथे सुरु असलेल्या निळे निशाण सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला पाचव्या दिवशी अखेर यश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर तालुक्यातील गोरगरीब जनतेचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विषयी समस्यांचे प्रश्न मार्गी

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर ग्रामीण रुग्णालयचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन. डी.महाजन.यांच्या मनमानी कारभार व निर्दयी धोरणाच्या निषेधार्थ दिनांक २६/०२/२०२४पासून निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. रावेर तालुक्यातील गोरगरीब शेतमजूर कष्टकरी वर्गाला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नाही त्याकरिता दी.२८/०२/२०२४पासून ठिय्या आंदोलन चे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात आले. [ads id="ads1"]  
   संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांनी स्वतः आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन जनहिताच्या आरोग्याच्या संबंधी मागण्या लावून धरल्या. त्या दरम्यान आनंद भाऊ बावीस्कर यांची प्रकृती दिनांक १ मार्च २०२४ रोजी खालावली. तेव्हा आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करून खालील नमूद असलेल्या मागण्या मंजूर करून नायब तहसिलदार संजय तायडे व वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वप्नील कळसकर यांच्या हस्ते देऊन उपोषण सोडविण्यात आले. [ads id="ads2"]  

कोण कोणत्या मागण्या मान्य
१)डॉ.एन. डि.महाजन यांची तडकाडकी बदली.
२)वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वप्नील कळसकर यांची ग्रामीण रुग्णालय रावेर.येथे नियुक्ती करण्यात आली.
३)रुग्णवाहिकेची तत्काळ व्यवस्था करण्यात आली.
४) नवजात शिशू करिता अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आले.
५)महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया व सिजर या करिता स्री रोग तज्ञ डॉ.नियुक्ती करण्यात आली.
६)अपघात झाल्यास एक्सरे काढण्याची व्यवस्था करण्यात आली.
७) रक्त पेढी कर्यानवित करण्यात आली.
८)अंतर रुग्णांकरिता विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.
९)रुग्णाची तपासणी सकाळ व सायंकाळ करण्यात येईल असे ठरविण्यात आले.

१०)या मागण्या मान्य जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जळगाव यांनी मान्य करून मागण्या मान्य असल्याचे पत्र संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर यांना देण्यात आले. त्या प्रसंगी नायब तहसिलदार संजय तायडे, व वैद्यकीय अधीक्षक डॉ स्वप्नील कळसकर, व वैद्यकीय अधिकारी,शुभांगी चौधरी व ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी जिल्हा महिला प्रमुख चारुलता सोनवणे,सदाशिव निकम,नंदा भावटे,वैशाली हेरोळे,अशोक तायडे,सुधीर सैगमिरे,विलास तायडे,अनिल इंधाटे,लक्ष्मी मेढे,घुमा तायडे,सावन मेढे,गोकुळ करवले, इम्रान खान,विजय धनगर, चंद्रकांत सोनवणे,विक्की जाधव ,धनराज घेटे,आकाश,निकम,संकीत तायडे,उदय वाघ, राकेश तायडे,मनोज लाहासे,विलास अटकाळे, चंबाबाई अवसरलमल, जोस्ना सन्यास,नम्रता हिवरे,अलका जाधव,कविता महाले,वत्सला करवले,रेखा तायडे, यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!