रावेर तालुका प्रतिनिधी (विनोद हरी कोळी)
रावेर तालुक्यातील अजंदा ,निंबोल, ऐनपुर ,विटवा, सुलवाडी, कोळदा ,धामोडी, कांडवेल या गावातून व शेतातील बांधावरील झाडांची सर्रासपणे कत्तल होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार रावेर येथील वनविभाग अधिकारी? [ads id="ads1"]
सहा महिने आधी समस्त नागरिकांनी रावेर येथील वनपाल अधिकारी यांना झाडांची खूप कत्तल होत आहे याला आळा बसेल का ? याबद्दल सुचित केले होते पण वनपाल अधिकारी बावणे साहेब यांनी जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे परिणामी रावेर रसलपुर येथील काही दलालांनी सर्रासपणे वृक्षतोड करून खूप काही झाडांची संख्या कमी केली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रश्न पडला आहे की ? शासनाने नेमून दिलेला वनपाल अधिकारी त्याचे कर्तव्य व्यवस्थित निभावत नाही, तसेच या दलालांपासून हप्ते घेऊन जाणून बुजून डोळ्यांवर पडदा टाकला आहे की काय, असा प्रश्न ?रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना पडला आहे. [ads id="ads2"]
झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना एकीकडे शासन राबवत असून दुसरीकडे मात्र भर दिवसा हिरवेगार झाडांची कत्तल जोरात चालू आहे याला लवकरात लवकर आळा बसला पाहिजे. नाहीतर समस्त निसर्ग धोक्यात येईल. तसेच ही वृक्षतोड थांबली नाही तर पाऊस सुद्धा पडणार नाही आणि शेतकऱ्यांना पुढे चालून उपासमारीची वेळ येईल त्यामुळे वनपाल अधिकारी बावणे साहेब यांनी लवकरात लवकर वृक्षतोड करणाऱ्या दलालांना आळा घालावा अशी मागणी रावेर तालुक्यातील हजारो नागरिकांकडून होत आहेत.


