रावेर वनविभागाचे (Raver Forest) वन परिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी रात्री भेट दिली. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी दररोज रात्रीच्या वेळेस फिरत आहे. मात्र याचा काही एक फायदा दिसून येत नसून गावकरी खूप धास्तावले आहे. रात्री अप रात्रीच्या वेळेस बाहेर पडण्यास घाबरत आहे. त्यामुळे जणु गावात संचार बंदी लागली की काय? असेच चित्र आहे. [ads id="ads2"]
तर गावकऱ्यांच्या मते या सर्वांना कारण म्हणजे हतनूर धरणाच्या(Hatnur Dam) बॅक वॉटर चे पाणी, पाणी गावाच्या अवती भोवती थांबत असल्याने अशा हिंसक प्राण्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध होत आहे. आणि गावातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. तरी सर्व गावकरी शासनाकडे विनंती करत आहे की, गावातील काही घरांचे पुनर्वसन झाले आहे व काही घरे पुनर्वसनाचे बाकी आहे तरी आमच्या संपूर्ण गावाचे पुनर्वसन करून आम्हास लवकरात लवकर अन्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी नाही तर गाय बकरी प्रमाणे गावातील लोकांचा ही जीव जाईल.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
गेली २५/३० वर्षे झाले भामलवाडी (Bhamalwadi Taluka Raver) गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे त्यामुळे येत्या निवडणुकी अगोदर आमच्या गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल का? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.



