रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) दि १६. रावेर तालुक्यातील उदळी बुद्रुक व निंभोरा बुद्रुक या गावी दिनांक १४ दुपारी ४. वाजता निंभोरा बुद्रुक येथे सायं.६. वाजता बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीचे प्रास्ताविक रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी श्रद्धेय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर यांच्या आदेशान्वये गण, गट सर्कल बुथ हे बांधणे पक्ष कशासाठी करत आहे या संदर्भात कार्यकर्त्यांना माहिती दिली. [ads id="ads1"]
या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मा. शमीभाताई पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की रावेर लोकसभा मतदारसंघातील व रावेर तालुक्यातील ७. गट व १४ गण यामध्ये पक्षाच्या माध्यमातून उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरणार असून आपल्याला वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून रावेर तालुक्यातील सर्व सर्व बुथबांधणी करून पूर्ण तयारीनिशी निवडणुकीमध्ये उभे राहायचे आहे. [ads id="ads2"]
या बैठकीला जिल्ह्याचे पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी , गण गटातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन रावेर तालुका सरचिटणीस कांतीलाल गाढे यांनी केले तर आभार संजय कोचुरे यांनी मानले.