यावल ( सुरेश पाटील )
आज सोमवार दि.१८ मार्च २०२४ रोजी सकाळी महसूल पथकाने पकडलेले अवैध वाळू वाहतुकीचे नवीन कोरे बिना क्रमांकाचे तसेच आरटीओ कडून पासिंग न झालेले लेलँड कंपनीचे वाहन चालक, मालकाने आज यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून तहसीलचे गेट तोडून पळवून नेल्याची घटना घडली त्यामुळे यावल महसूल व पोलिसांना एक नवे आव्हान समोर आले आहे. [ads id="ads1"]
यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शना खाली यावल येथे अवैध वाळू वाहतूक करणारी अशोक layland कंपनीची विना क्रमांकाची गाडी यावल येथे यावल फैजपूर रोडवर पकडून तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आली असता वाहन यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्यानंतर काही वेळातच त्या लेलँड वाहनाच्या चालकाने, मालकाने आपले नवे कोरे वाहन यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून पळून नेल्याची घटना घडल्याने यावल महसूल व पोलीस दलात मोठी खळबळ उडाली.वाळू वाहतूक दराने यावल तहसील कार्यालयातून वाहन पळून नेल्याची ही घटना घडल्याने महसूल समोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. [ads id="ads2"]
आज दि.१८ रोजी सकाळी अवैध वाळू वाहतकदारांवर कारवाई करण्यासाठी महसूल पथकातील तलाठी डो.कठोरा येथील तलाठी वसीम तडवी, बोरखेडा येथील तलाठी शरीफ तडवी,यावल तलाठी यावल ईश्वर कोळी,साकळीचे मिलिंद कुरकुरे,कोतवाल समीर तडवी शिरसाड यांचे पथक तैनात करण्यात आले होते त्यांनी सकाळी यावल फैजपूर रोडवर एक नवे कोरे लेलँड कंपनीचे बिना क्रमांकाचे आणि पासिंग न केलेले अवैध वाळू वाहतूक वाहन पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले असता काही वेळातच त्या लेलँड कंपनीच्या वाहन चालकांनी तथा मालकांनी ते वाहन यावल तहसील कार्यालयाच्या आवारातून गेटची तोडफोड करून पळून नेले याबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू आहे, या घटनेमुळे यावल महसूल व यावल पोलिसांना एक नवे आव्हान समोर आले असल्याचे बोलले जात आहे.



.jpg)