रावेर प्रतिनिधी (दिपक तायडे)
रावेर येथील माजी उपनगराध्यक्ष अॅड सुरज प्रकाश चौधरी यांची नुकतीच विधी व न्याय विभाग केंद्र सरकार द्वारा नोटरी भारत सरकार नियुक्ती करण्यात आली आहे.
विधी व न्याय विभाग केंद्र सरकार द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या दि. १४ मार्च २०२४ निवड यादी द्वारा त्यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. [ads id="ads1"]
अॅड सुरज चौधरी यांना गेल्या १८ वर्षापासून वकिलीच्या व्यवसायाचा अनुभव असून ते येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी मित्रपरिवार, तेली समाज पंच मंडळ, रावेर विकास युवाशक्ती फाउंडेशन, कारागीर व्यायाम शाळा पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. [ads id="ads2"]
आपल्याला मिळालेल्या या नोटरी पदातून आपण आगामी काळात अधिक सामाजिक कार्यात उपयोग करणार असून याचा फायदा सर्वसामान्यांना करून देण्यास कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले



