रावेर(सुवर्ण दिप वृत्तसेवा) रावेर शहरामध्ये आठवडे बाजार येथे दि.८ शुक्रवार रोजी सकाळी ११. वाजता मुस्लिम बौद्ध मातंग कैकाडी मन्यार अशा बहुसंख्य तरुणांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. [ads id="ads1"]
श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या कार्यपद्धतीवर वंचितांना न्याय देण्याची ग्वाही देणारे आणि करून दाखवणारे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष माननीय रेखाताई ठाकूर ह्या ओबीसी समाजातल्या असून अशा व्यक्तींना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बसवणे हे आजपर्यंत कोणत्याच पक्षाने केले नाही ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाने करून दाखवले आहे. म्हणून माननीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजनांना एकत्र करण्याचे काम करत आहे त्यांच्या या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून रावेर शहरातील बहुसंख्य तरुणांनी जाहीर प्रवेश केला. [ads id="ads2"]
तसेच रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे शहरांमध्ये नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये वंचित आदिवासी भटके, शोषित पीडित लोकांचे कामे अहोरात्र करत असून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम करीत आहे त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून रावेर शहरातील बहुसंख्या मुस्लिम, बौद्ध, मातंग, कैकाडी, मन्यार या समूहाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणाऱ्यांची नावे एकनाथ गाढे, जावेद शहा, खलील खान ,साजिद खान, राजू रणसिंगे, समीर शहा ,अशीफ शहा, शे साजिद ,शेख कलीम ,युसुफ भाई ,हरी मुनिंद्र, अफजल खाश ,मोहम्मद शहा ,शेख नदीम, विजय रणसिंगे ,कासम शहा, नफीस ,अहमद ,शरीफ मन्यार, नारायण जाधव, जानीद शहा, शमशुद शहा ,नदी शहा, अफसर खान, रउप शेख इत्यादी तरुणांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेश करतेवेळी माजी जिल्हा संघटक याकूब शेख नजीर, ता. उपाध्यक्ष सलीम शहा, कंदरसिंग बारेला, इमरान शेख बहुसंख्या तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.