महाशिवरात्रीनिमित्त अति प्राचीन श्री तारकेशवर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील )

येथील अति प्राचीन आणि संपूर्ण यावल करांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तारकेशवर महादेव मंदिरात काल शुक्रवार दि.८ रोजी महाशिवरात्रीनिमित्त भल्या पहाटेपासुन भाविकांची गर्दी झाली.गुलाबी थंडीच्या वातावरणात सकाळीच ५:३० वा.तारकेश्रवर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.महादेव मंदिराचा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात येऊन भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आल्या होत्या.परिसरातलया रस्त्यावर तसेच तारकेशवर मंदिरावर लाईटींग लावण्यात आली होती त्यामुळेच परिसर ऊजळून राहिला होता.सकाळचे वातावरण प्रसन्न वाटत होते.धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सकाळीच पांच ते सहा भाविकांनी सपत्नीक महाकाल् तारकेशवर महादेवाची आरती म्हणत मोठ्या श्रद्धेने पुजा केली.श्री गजाननाची आरतीनंतर महाकाल भोलेनाथाची आरती करण्यात येऊन तद्नंतर मंत्र पुष्पांजली मोठ्या सुरेल स्वरात म्हणून जयजयकार करण्यात आला. [ads id="ads1"] 

यावेळेस भाविक मोठ्या संख्येत उपस्थित होते सर्वाना आरती देऊन पेढ्यांचा व खडीसाखर प्रसाद वाटण्यात आला.महाशिवरात्रीनिमित्त महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.महादेव दर्शनानंतर भाविक भक्तांसाठी उपवासाचा फराळ म्हणून साबुदाणा खिचडी ,केळी,राजगिरा लाडु याचे वाटप तारकेशवर महादेव मंदिराचे कार्यकर्ते माणिक दादा देशमुख,दिनेश कोतवाल, संजय पाठक,येवले आदींनी केले.तसेच तारकेशवर भजनी मंडल यावल यांनी तबला पेटीच्या साथीने भक्तीगीत गायलीत या वेळेस श्रोते मोठया संख्येत उपस्थित राहुन त्यांना साथ देत होते.भजनाचा कार्यक्रम दिवसभर चालू आहे.तसेच फराळाचे वाटप उशीरा संध्याकाळपर्यंत चालु होते. [ads id="ads2"] 

  बाजूच्या परिसरातील तरुणांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येत उपस्थिती देऊन सहकार्य केले.शहरातील जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.आज रात्रभर तारकेशवर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात येणार असून पुरोहिताचया सुरेल स्वरात मंत्रोच्चार करण्यात येऊन पांच जोडप्याकडून अभिषेक करण्यात येणार आहे.

पहाटे पर्यंत शाश्त्रोक्त पद्धतीने ब्राह्मणवृंदाच्या उपस्थितीत मंत्रोपोचाराने पुजा करण्यात आली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!