यावल तालुक्यात होणारी गोहत्या थांबविण्याची मागणी : मानद पशु कल्याण अधिकाऱ्यांकडून निवेदन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

यावल शहरात व तालुक्यात सर्रास बेकायदा अनधिकृत होणारी " गोहत्या " थांबवावी या संदर्भात यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले यांच्यासह ' गो ' प्रेमी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन दिले,या संदर्भात यावल  महसूल व फैजपूर भाग डिवायएसपी,उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी आणि यावल व फैजपूर नगरपरिषदेचे प्रभारी प्रशासक काय कारवाई करणार..? याकडे ' गो - प्रेमी, ' गो ' रक्षक याचे लक्ष वेधून आहे.  [ads id="ads1"]  

   आज मंगळवार दि.५ रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,राज्यात गोहत्या बंदी असल्यावर देखील कायद्याचे उल्लंघन करत कसाई हे गोमातेची व‌ गोवंशाची हत्या करत आहे ज्या गोमातेने अमृत दुध पाजले, ज्या नंदीजी ( वृषभ / बैल  ) देवांनी सोन्याची असलेली शेती मशागत व फुलवित मेहनत घेऊन अन्नधान्य निर्माण कार्यात आपले योगदान दिले आहे आणि आज पण देत आहेत त्यांचीच खुलेआम कायदा हत्या होते हे आपल्या देशासाठी घातक आहे जर गोमाता व‌ नंदीजी नसले तर भयावह.परिणाम निर्माण होतील तरी गोमाता ही सर्वांचा आधार आणि दैवत आहे याची दखल घेत गोहत्या करणाऱ्या कसाईला कठोर शासन करावे असे निवेदन गोप्रेमी कडुन देण्यात आले. [ads id="ads2"]  

  महाराष्ट्र राज्य मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले,समाधान कोळी,निलेश कोळी,शंकर कोळी,समाधान बाविस्कर,यश कोळी,स्वप्निल कोळी,विकास सोनवणे इत्यादी गोप्रेमी बांधवांनी यावल तहसीलदार यांना निवेदन दिले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!