वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोलीस पथकाच्या ( आयपीएस अधिकारी ) वाहनास दिली जोरदार धडक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल तालुका महसूल,पोलीसासह अवैध धंदे वर्तुळात मोठी खळबळ

यावल ( सुरेश पाटील ) बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात यावल फैजपूर रोडवर हिंगोणा शिवारात यावल पश्चिम भागातून पूर्व भागात जाणारे विना परवाना वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ६ चाकी डंपरने पोलीस पथकाच्या ( फैजपूर उपविभागीय कार्यालयातील आयपीएस असलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या कार्यक्षेत्रातील ) खाजगी वाहनास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पाठीमागून धडक देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून फैजपूर पोलीस स्टेशनला ३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.सदरची घटना शुक्रवार दि. ८ रोजी रात्री २३:३० वाजता घडल्याने यावल तालुका महसूल,पोलीस आणि अवैध धंदे चालकांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली असली तरी यामुळे आता पोलीस व  महसूल विभाग संयुक्तपणे यापुढे नेमकी काय कारवाई करणार..? किंवा कर्तव्यदक्ष अशा रणरागिनी असलेल्या आयपीएस, ( dysp ) आयएएस ( प्रांत अधिकारी ) यावल तहसीलदार या महिला अधिकारी अवैध अवैध गौण खनिज आणि अवैध धंदे चालकांविरोधात ठोस असे निर्णय काय घेणार..? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. [ads id="ads1"] 

        फैजपूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पो.ना.अलताफ अली हसन अली नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर विभाग फैजपूर कार्यालय यांनी फिर्याद दिली की, संशयित आरोपी मयूर सुरेश कोळी वय ३० राहणार डांभुर्णी तालुका यावल. प्रशांत उर्फ दादू पुरुषोत्तम पाटील रा. डांभुर्णी. ज्ञानेश्वर उर्फ नाना नामदेव तायडे रा.कोळन्हावी ता.यावल. यांनी शुक्रवार दि.८ मार्च २०२४ रोजी रात्री २३:३० वाजेच्या सुमारास फैजपूर ते यावल रोडवरील हिंगोणा शिवारात एच.पी.पेट्रोल पंपाजवळ अशोक लेलँड डंपर एमएच - ४०- एन- ६५८८ या डंपरने चोरीची वाळू वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस पथकास बघून त्याचे ताब्यातील डंपर न थांबवता भरधाव वेगात चालवून पोलीस पथकाच्या खाजगी वाहनास पुन्हा पुन्हा साईडने दाबून त्यानंतर डंपर हळू करून फिर्यादी व पथकाच्या वाहनास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वाहनास पाठीमागून धडक देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला तसेच डंपर रोडच्या खाली पलटी करून डंपरच्या व पोलीस पथकाच्या खाजगी गाडीच्या नुकसानीस त्याच्या स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत झाला या कारणावरून फैजपूर पोलीस स्टेशनला तीन संशयीचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोडे व त्यांचे सहकारी करीत आहे. [ads id="ads2"] 

      फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत व परिसरात अवैध धंद्यांबाबत जोरदार चर्चा व बातम्या प्रसिद्धी माध्यमात झळकत आहे, दोन नंबर व्यवसाय करणाऱ्यांकडून दरमहा नियमित हप्ते वसूल करणारा तसेच अवैध विनापरवाना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर,डंपर रिक्षा, मिनिडोर, अवैध गुरढोरांची वाहतूक,मध्य प्रदेशातून रावेर तालुका,पाल मार्गे यावल तालुक्यात येणारा गुटखा,वाहन चालकांकडून मासिक नियमित हप्ते घेणारा तो बेकायदा  "कलेक्टर "कोण..? आणि गेल्या वर्ष दोन वर्षापासून एकाच व्यक्तीकडे कलेक्शनचे काम कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याबाबत सुद्धा अवैध व्यावसायिकांमध्ये नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे ही बेकायदा वसुली फैजपूर उपविभागीय अधिकारी यांनी बंद करून तो कलेक्टर कोण..? त्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!