रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील आर पी आय आठवले गटातील 25 तरुण कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. दि.२३ शनिवार रोजी सायंकाळी ७ वाजता बादल मशाने यांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये श्रद्धय बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचे संपूर्ण ओबीसी ,भटके, वंचित समूहांना सोबत घेऊन चालणे आणि सत्तेमध्ये बसवणे हा एक ध्यास मणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. याची संपूर्ण माहिती वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांनी जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दिली.[ads id="ads1"]
या देशात तमाम बहुजनांना, वंचितांना ,बौद्ध ,मुस्लिमांना जर कोणी वाचू शकत असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेते आहे.संपूर्ण वंचितांना न्याय देऊन व त्यांचे रक्षण करण्याचे व संविधान जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहे या सर्व बाबतीचा विचार करून आठवले गटातील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा मा. रेखाताई ठाकूर तसेच जळगाव पूर्वच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील व रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या वरती विश्वास ठेवून विवरा येथील 25 तरुणांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करतेवेळी माजी जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर तालुका उपाध्यक्ष सलीम शहा यासीन शहा सचिव ज्ञानेश्वर तायडे जावेद शहा हे उपस्थित होते.[ads id="ads2"]
जाहीर प्रवेश करणारांची नावे. बादल मशाने, विक्की गाढे ,आकाश गाढे, विशाल सोनवणे, राहुल गाढे ,विक्रम संन्यास ,सायबू काळे ,पंकज गाढे ,प्रदीप गाढे नजीमुद्दीन तडवी , संदीप गाढे, शील भालेराव, प्रीतम गाढे ,अमोल गाढे ,अक्षय वाघोदे, संजय जाधव ,उत्तम गाढे ,आशुतोष शिरसोदिया , ,विलास गाढे ,अनिल रायमळे इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय तायडे यांनी केले व सलीम शहा यांनी आभार मानले.