रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे सम्राट अशोक,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त सामाजिक एकता मिशन गृप कुसुंबे खुर्द यांच्या वतीने सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचा किर्तनाचा कार्यक्रम उद्या दिनांक१३/०४/२०२४रोजी सायंकाळी सहा वाजता कुसुंबा खुर्द येथे आयोजित करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ हे राहणार आहेत तर तालुक्याचे आमदार माननीय श्री.शिरीषदादा चौधरी यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे ह्या असणार आहेत.कार्यक्रमावेळी प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन योगेश पाटील (उपसभापती)कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर,श्री.दिलीप साबळे तालुकाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,अर्जुन रामकृष्ण पाटील प्रगतशील शेतकरी कुसुंबा या मान्यवरांच्या हस्ते होईल.[ads id="ads2"]
तर या कार्यक्रमाला मुबारक तडवी (सरपंच)कुसुंबे खुर्द व मुकेश पाटील (उपसरपंच)यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन छगन पाटील,जमशेद तडवी,चांगो भालेराव,प्रदीप सपकाळे(ग्रा.पं. सदस्य)देविदास पाटील,सुपडू तडवी,कडू महाजन,निवृत्ती महाजन,अय्युब तडवी,सुनील चौधरी,मुकुंदा धनगर,दिलीप जावळे,एकनाथ कावडकर,दगडू धनगर,कैलास धनगर,जुम्मा तडवी,अक्तर तडवी,जितेंद्र पाटील,मनोज पाटील,पुंडलिक धनगर,योगेश पाटील,दीपक जावळे,सतीश पाटील यांनी केले आहे तर के.एम.सरकार गृप,जय भवानी व्यायाम शाळा,कमली सरकार गृप,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
तरी तालुक्यातील जनतेने राष्ट्रीय किर्तनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक यांचे सह कुसुंबा खुर्द ग्रामस्थांनी देखील केले आहे.