रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उटखेडा येथील जि. प. मराठी मुलांची शाळा येथे विद्यार्थ्यांना रमाई नगर उटखेडा यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उटखेडा गावचे सरपंच कुंदन महाजन यांनी भूषविले.[ads id="ads1"]
महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपसरपंच रौनक तडवी आणि ग्रा. पं. सदस्य सुधाकर पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. गावचे विद्यमान पोलीस पाटील रवींद्र महाजन आणि माजी पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील यांनी दीपप्रज्वलन व धुपपूजा केली. जि. प. मराठी शाळा उटखेडा येथील मुख्याध्यापिका सावकारे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम सुरू केला. [ads id="ads2"]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्ममहोत्सव समितीचे अध्यक्ष शालिक तायडे व उपाध्यक्ष सिद्धार्थ झाल्टे, अंगणवाडी सेविका, ग्रा. प. सदस्य जितेंद्र चौधरी व महेंद्र पाटील, नसरुद्दीन तडवी,विनोद भास्कर वानखेडे, पितांबर तायडे, सुरेश सोनवणे, राजेंद्र पाटील, जे. पी. महाजन, बळीराम खरे, गौरव पाटील, बाबूलाल सोनवणे, विवेक महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक झाल्टे यांनी केले . तसेच कार्यक्रम रमाई मित्र मंडळचे पदाधिकारी मुरलीधर तायडे, संदीप तायडे, सुखदेव सोनवणे, विजय सवर्णे, ईश्वर तायडे, पंकज तायडे, आनंदा तायडे, दीपक वाघ, फकिरा वाघ मनोहर तायडे, विलास वानखेडे, अजय तायडे, किरण झाल्टे, रामकृष्ण तायडे, दीपक वानखेडे, अविनाश वानखेडे, रवींद्र झाल्टे, धनराज वानखेडे, गौरव तायडे यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.