यावल ( सुरेश पाटील )
दि. ६ एप्रिल २०२४ रोजी जळगाव येथील कमल पॅराडाईज हॉटेलमध्ये "जळगाव युथ आयकॉन अवॉर्ड २०२४ " आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमांत सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,वैद्यकीय, उद्योजक,विधी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट असे काम करणाऱ्या युवकांचा सत्कार करण्यात आला.[ads id="ads1"]
या कार्यक्रमांमध्ये यावल येथील एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.अभय गणेश रावते यांना "जळगाव युथ आयकॉन २०२४ " अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.डॉ.अभय रावते यांनी सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले..कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी व हिंदी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते डॉ.अभय गणेश रावते यांना जळगाव युथ आयकॉन २०२४ अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.[ads id="ads2"]
तसेच कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.निलेश चांडक व डॉ.संदीप जोशी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर अभय रावते यांना युथ आयकॉन २०२४ " अवॉर्ड मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



.jpg)