रावेर प्रतिनिधी/मुबारक तडवी
रावेर तालुक्यातील मोठावाघोदा .ता. रावेर मोठा वाघोदा येथील शेख फरीद शेख नबी यांचा अवघं १२वर्षे वय असलेल्या शेख अजमल या लहानग्या चे सन २०२१पासून सलग चार वर्ष झाले अविरत संपूर्ण महिनाभर पवित्र रमजान महिन्याचे काटेकोरपणे पालन सेहरी नमाज ईबादत (पावन भक्ती)करीत पुर्ण होत आहेत.[ads id="ads1"]
यंदा ही शेख अजमल ने पवित्र रमजान महिन्याचे २७ रोजा (उपवास)पुर्ण केले आहेत व उर्वरित सर्व महिनाभराचे रोजे ही पुर्ण करण्याचा मानस पुर्ण होतोय इतके कमी वयात अल्लाह मुहम्मद पैगंबर यांची ईबादत भक्ती आचारण तंतोतंत काटेकोरपणे पालन करुन सलग चार वर्षांपासून अवलंब करून संपूर्ण रमजान महिन्याचे निरंक रोजा उपवास पुर्ण करीत असल्याचे पाहून सर्वत्र शेख अजमल शेख फरीद या लहानग्या चे मोठा वाघोदा वासिय कौतुक करीत आहेत



