मोठा वाघोदा ता.रावेर प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी मोठया प्रमाणावर गुटखा माफिया विरूद्ध कारवाई सत्र सुरू आहे. पण रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा सह परिसरात कोर्टाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची सीमेलगत लागून असलेल्या मध्यप्रदेशातुन चोरट्यांमार्गाने तस्करीच्या आधारे वाहतूक करुन राजरोसपणे विक्री होत असलेल्या मौखिक आरोग्यास गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणार्या विमल पानमसाला गुटक्याची सर्रासपणे विक्री सुरू आहे.
[ads id="ads2"]
नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक या घातक गुटखा विक्रीवर संबधीत अन्न व औषध प्रशासन विभाग आर्थिक दुर्लक्ष करत असल्याचे चर्चा सुज्ञ नागरिकांकडून चर्चित होते आहे. या अवैध गुटखा विक्रीवर कारवाईसाठी अन्न औषध प्रशासनास कधी मुहूर्त सापडणार??असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना भेडसावत आहे.[ads id="ads2"]
मोठा वाघोदा गांव अंकलेश्वर बुर्हानपुर मध्यप्रदेश महामार्गावर असल्याने परराज्यातुन मोठया प्रमाणावर सुप्रीम कोर्टाचे न्यायदेवतेनी प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटखा या पानमसालाची खाजगी वाहनाने चोरट्या मार्गानी वाहतुक करून रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा सह काही गुटखा माफियांकडून सर्रास हेराफेरी करण्यात येत आहे. व मोठा वाघोद्यात दोन पान मसाला विक्री दुकानात आणि घरातील गोदामात गुटख्याची साठवण केली जाते आणि पानटपरी सह विविध होलसेल ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची विक्री करण्यात येत आहे. शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानिकारक पानमसाला गुटख्याची एका महिन्यास सुमारे लाखोंची विक्री करण्यात येत आहे. या बाबतची माहीती संबधीत अन्न व औषध प्रशासन विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असुन जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात आहे. मात्र प्रशासनाकडुन याकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत आहे का?? जर दुर्लक्ष नाही तर कारवाई का होत नसल्याचे? कारण काय आहे.?हेच उमगत नसल्याचे जनमाणसांतून बोलले जात आहे



