यावल ( सुरेश पाटील ) वेतन अधिक्षक कार्यालयात निधी उपलब्ध असताना वेतन पथक कर्मचाऱ्यांचा जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आर्थिक उद्देश हेतू सफल न झाल्याने साडेसहा कोटी रुपयाचा निधी परत गेला यामुळे शिक्षकांना वेतन,पुरवणी बिल,मेडिकल बिल,सातवे वेतन आयोगाचा हप्ता न मिळाल्याने जळगाव जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यसचिव एस.डी.भिरुडसर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काल सोमवार दि. ८ रोजी माध्यमिक विभाग वेतन अधीक्षक कार्यालयात तातडीची सभा ४० ते ४५ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह घेण्यात आली...यावेळी वेतन पथक कर्मचारी अमोल महाजन यांच्या कामातील हलगर्जीपणा व आर्थिक मागणी बाबतच्या अनेक तक्रारी सादर करून सिद्ध करण्यात आल्या..शिक्षकांचे अनेक बिले निघाली नाही व शासनाकडे साडेसहा कोटींचा निधी परत गेला.[ads id="ads2"]
कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली..वेतन अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी योग्य अशी समर्पक उत्तरे दिली नाही.त्यामुळे पूर्ण कार्यालयात साहेबांशी कर्मचारी यांची मिलीभगत समन्वय असल्याचे आढळून आले अनेक शिक्षक संघटना पदाधिकारी यांनी कार्यालयीन कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली....व अमोल महाजन यांच्यावर वरिष्ठ कार्यालयात कारवाईची मागणी प्रस्थापित करण्यात आली,
यावेळी सदरील मिटींगला आर.एच.बाविस्कर,जे.पी.सपकाळे,शैलेश राणे,सुनील गरुड,डी.ए.पाटील,डिगंबर पाटील,अरुण सपकाळे,सिद्धेश्वर वाघूळदे,मंगेश भोईटे,गोपाळ महाजन, एन.ओ.चौधरी, गिरीश भारंबे,प्रदीप वाणी,शंकर वाणी,हरीश तळेले,राहुल वराडे,एस.के.पाटील,चंपालाल चौधरी,दिनेश पाटील,सुनील तायडे,महेंद्र पाटील,संदीप डोलारेभरत चौधरी,सुशील झोपे,शिरीष नेमाडे,मनोज वाघ,सतीश पवार,उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक संघ,माध्यमिक शिक्षक संघ,शिक्षकेतर संघ,कलाध्यापक संघ,महाविद्यालयीन ज्यूकटो संघटना,यांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक संघटनांनी या गंभीर अशा चर्चेचे व्हिडिओ चित्रण सुद्धा केल्याने जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासह शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.


