यावल पूर्व व पश्चिम वन विभागात अधिकारी कार्यालयात बसून तर बेकायदा कर्मचाऱ्यांची चमकोगिरी
यावल ( सुरेश पाटील ) सातपुड्याच्या पायथ्याशी कोरपावली दहिगाव - रस्त्यावर उत्तर दक्षिण असलेल्या नाल्या जवळ सातपुडा जंगलात दुर्मिळ असलेले अमूल्य रोहिण जातीच्या लाकडाचा मोठा साठा आज दि.१ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका ठिकाणी पडून असल्याने यावल पूर्व व पश्चिम वन विभाग वन क्षेत्रपाल हे कार्यालयात बसून कामकाज करीत असल्याने आणि कारवाई होत नसल्याने तसेच बेकायदा काही एक दोन कर्मचारी चमकोगिरी करून घेत असल्याने यावल चोपडा रावेर तालुक्यात सातपुडा जंगलात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की सातपुडा डोंगरातून सागवान,खैर लाकडासह रोहिण जातीच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वाहतूक सुरू आहे आणि या वृक्षाची कत्तल करणारे कोण आहेत..? हे वन क्षेत्रपाल यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असताना कारवाई होत नाही कारवाई झाली तरी आरोपी फरार झाल्याचे कारण सांगितले जाते यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल हे आपल्या कार्यालयात बसून कामकाज करीत असले तरी त्यांचे काही एक-दोन कर्मचारी एक ते दोन तर बेकायदा कर्मचारी आहेत ते आपल्या सोयीनुसार प्रसिद्धी माध्यमांना वेगळीच माहिती देऊन प्रसिद्धी करून घेत आहे, सागवान खैर,रोहीन, लाकडाच्या तस्करी व अतिक्रमणाबाबत बाबत मात्र ते आपले तोंड बंद ठेवत आहे.[ads id="ads2"]
तालुक्यात ठीक ठिकाणी लाकूड व्यावसायिक सर्रासपणे जुन्या सागवानी लाकडाच्या पासेसच्या नावाखाली नवीन सागवानी लाकडाचे साहित्य बिनधास्त खुलेआम सर्रासपणे विक्री करीत आहे,सातपुडा जंगलात दुर्मिळ असे रोहिण जातीचे वृक्ष यांना फार मोठे महत्त्व आहे या वृक्षाच्या सालीपासून तयार होणारी गावठी दारू कडक लोकप्रिय आहे, त्यामुळे दारू तयार करण्यासाठी रोहिणी जातीच्या वृक्षाची साल मोठ्या प्रमाणात वापरली जाते व लाकडाचा वापर लाटणे बनविण्यासाठी केला जातो हे उद्योग सर्रासपणे सुरू आहेत.यावल पूर्व व पश्चिम वनक्षेत्रपाल हे आपल्या कामकाजाबाबत जनतेच्या माहितीसाठी माहिती एकाच वेळेला सर्व प्रसिद्धी माध्यमांना देत नसल्याने यांच्या वाहनांचे चालक आणि काही कर्मचारी फक्त आपल्या सोयीनुसार चमकोगिरी करीत असल्याचे सुद्धा उघड झाले आहे याबाबत प्रधान मुख्य वन संरक्षक ( वनबल प्रमुख )नागपूर, वनसंरक्षक धुळे,यांच्याकडे उपवनसंरक्षक आणि सहाय्यक वन संरक्षक तसेच यावल पूर्व व पश्चिम वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्या बाबत रीतसर तक्रार केली जाणार आहे.कारण कोरपावली दहीगाव रस्त्यावर लाखो रुपयाचे बेवारस लाकूड पडून असताना वन विभागाला साधी खबर किंवा दिसून येत नसल्याने याबाबत लाकूड व्यावसायिकांचे आणि वनक्षेत्रपालांसह काही वन कर्मचाऱ्यांचे हितसंबंध असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.



