स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिंदे,पोलीस हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील हे ३ जण अडकले लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
 


यावल  ( सुरेश पाटील )
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांना तक्रारदारास धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे कारण सांगून तडजोडीअंती १,५०,०००/- रु. ( दीड लाख रुपयाची लाच ) लाचेची मागणी केली व ती लाच स्वीकारताना ते तिघांचे त्रिकूट धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. सदरची घटना १ एप्रिल २०२४ रोजी रात्री घडल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यात सुद्धा मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"]  
       याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर लाचेची रक्कम पोलीस हवालदार नितीन मोहने यांचे हस्ते स्विकारतांना रंगेहाथ पकडले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला.तकारदार हे दोंडाईचा ता.शिंदखेडा जि. धुळे येथील रहिवाशी असुन तकारदार हे राजकिय
व सामाजिक चळवळीत सकिय आहेत.तक्रारदार यांचे त्यांच्या राजकिय सहका-यांशी मतभेद झाल्याने राजकिय आकसाने त्यांचे विरुध्द दोंडाईचा पो.स्टे.येथे राजकिय गुन्हे दाखल झाले आहेत.[ads id="ads2"]  
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी तक्रारदार यांची भेट घेवुन त्यांना तुझ्यावर यापुर्वी दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती काढुन तसेच तुझ्यावर गुन्हे नोंद करुन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पार्श्वभुमीवर पोलीस स्टेशन कडुन प्रस्ताव मागवुन तुला जिल्हयातुन हददपार करणार असल्याचे सांगुन कारवाई होवु द्यायची नसेल तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे साहेबांना २,००,०००/- रुपये दयावे लागतील असे सांगुन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक शिंदे यांची भेट घेण्यास सुद्धा सांगितल्याने तक्रारदार यांनी दि.१ एप्रिल २०२४ रोजी
प्र.वि.धुळे कार्यालयाकडे तकार दिली.
     तकार नुसार  दि.१ एप्रिल २०२४ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय,धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावुन पडताळणी केली असता पोलीस निरीक्षक
दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदार यांचेकडुन पंचासमक्ष २,००,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदरची रक्कम पो.हवलदार नितीन आनंदराव मोहने व पो.हवलदार अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगुन सदर लाचेची रक्कम पो. हवा.नितीन मोहने व पो.हवा. अशोक पाटील यांनी तडजोडी अंती १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम दि.१ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी दोंडाईचा येथील दोंडाईचा धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळया जागेत पो.हवा.मोहने यांनी पंचासमक्ष स्वतःआहे.असुन त्यांचे विरुध्द भ्र.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
   सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम,मुकेश अहिरे,संतोष पावरा,रामदास बारेला,प्रविण मोरे,प्रशांत बागुल,प्रविण पाटील,सुधीर मोरे,जगदीश बडगुजर यांनी केली आहे.

सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर,अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.



#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!