निंभोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 



निंभोरा बु (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - भुसावळ तालुकयातील निभोरा येथे महामानव क्रांतीसुर्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त आज पासून १४/०४/२०२४ ते  १९/०४/२४ पर्यंत विविध स्पर्धा घेऊन साजरी करण्यात येत आहे. यामध्ये सकाळी १० ते दुपारी १२  वाजे पर्यंत महामानव यांच्या प्रतिमेचे पूजन व वंदना घेण्यात येईल त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन त्यानंतर १२ ते ३ स्नेह भोजनाचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी ५ ते १० पर्यंत वाजंत्री सह भव्य गावातून मिरवणूक काढण्यात येईल.[ads id="ads1"]  

सोमवारी १५/०४/२४ रोजी संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत  संगीत खुर्ची, निंबु चमचा, फुगा फोडणे ह्या स्पर्धा घेण्यात येईल.१६/०४/२४ मंगळवार रोजी सायं ६ ते ९ उशी गेम, स्लो सायकलिंग १७/०४/२४ बुधवारी  ६ते ९  कार्ड गेम, तिन पायी शर्यत, बकेट मध्ये चेंडू टाकने.[ads id="ads2"]  

१८/०४/२४ गुरुवारी सायं ६ ते ९ डान्स स्पर्धा , आनंद मेळावा १९/०४/२४ शुक्रवारी ६ते ९   अंध श्रद्धा व बुवाबाजी,हौसी गेम व बक्षिस समारंभ असे विविध प्रकारचे कार्यक्रम " त्रिरतन बुद्ध विहार, निंभोरा येथील मैदानात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा  लाभ फेकरी, दीपनगर, पिंप्री सेकंम, साकरी यांनी घ्यावा असे परमपूज्य विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निंभोरा वृ|| यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!