रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सांगवे गावात डॉ, बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्स्व साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरीक कमलबाई तायड़े यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुण धुप पूजा करुन सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले.[ads id="ads1"]
त्यानंतर ग्रामपंचयात सदस्य आयु. साहेबराव वानखेड़े यांचे कडून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र यावर आधारित विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले यावेळी वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले की 'हजारो वर्षापासून आपले हक्क आणि अधिकार यापासून वंचित, मागास,राहिलेला समाज , त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळऊन देणारा महापुरुष म्हणजे डॉ, बाबासाहेब आंबेडकर ' बाबासाहेबांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार घराघरात पोहचवणे हि तुमची आमची जवाबदारी आहे असे उपस्थितांना आवाहन केले.[ads id="ads2"]
तसेच विटवे येथे बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस ज्येष्ठ नागरीक प्रल्हाद अढागळे यांचे हस्ते प्रतिमा पूजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आला व मिरवणुकीस सुरवात करण्यात आली व मिरवणुकी दरम्यान निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक. पोलिस निरक्षक श्री. बोचरे साहेबांनी अभिवादन केले ग्रामपंचायत कार्यालयात ग्रा. सदस्य. गणेश मनुरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्या नंतर बसस्टॅंड परिसर येथे जयंती निमित्त पाणपोईचे ऊदघाटन लोकनियुक्त सरपंच आयु. मुकेश चौधरी यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी उपसरपंच, ईश्वर चौधरी, बीट हवालदार आयु, नितीन पाटील, ग्रा. पं. सदस्य,सुरेश कोळी, गजानन कोळी विमल भिल्ल, पोलिस पाटील, बाळु पवार, सुरेश भिल्ल, श्रीराम कोळी, सांगवे पोलिस पाटील, वैशाली एकनाथ कोळी,आशा सेविका संगीता सिताराम वानखेड़े, वैशाली महेंद्र कोळी, एकनाथ अढागळे,प्रमोद कोळी, सुरेश तायड़े, राजू वानखेड़े, कैलास मनुरे, नरेंद्र वानखेड़े , सुकलाल वाघ, गणेश तायड़े, व गावातील तरुण, विद्यार्थी, महिला गावकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते



