राजोरा येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सकीर्तन सप्ताहास सुरुवात

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील ) तालुक्यातील राजोरा येथील श्री विठ्ठल मंदिर मंदिरात सालाबाद प्रमाणे व हभप झेंडू जी महाराज बेडीकर यांच्या दिंडी परंपरेने व आशीर्वादाने सालाबाद प्रमाणे समस्त गावकरी मंडळी राजोरा येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न होत असलेला श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम किर्तन  सप्ताह दि.१८ एप्रिल २०२४ पासून शुभारंभ झाला.[ads id="ads1"]  

सदर कथा सप्ताहामध्ये व्यासपीठ प्रवक्ते हभप राष्ट्रीय कीर्तनकार गजानन महाराज धानोरेकर ( वाल्मीक आश्रम ) हे कथेचे निरूपण करणार असून दररोज सकाळी ५ते ६ काकड आरती,विष्णुसहस्रनाम सकाळी ७ ते८, कथा ८ ते 12 व दुपारी २ ते ५ श्रीमद् भागवत कथा ,संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आलेला आहे.[ads id="ads2"]  

  सदर नामसंकीर्तन सप्ताहा मध्ये हभप दिनकर महाराज कडगावकर,हभप कुणाल महाराज धरणगावकर,ह.भ.प. अविनाश महाराज आळंदी देवाची,ह.भ.प दुर्गादास महाराज खिर्डी,ह भ प धनराज महाराज अंजाळेकर, ह भ प भरत महाराज म्हैसवाडी ,ह भ प चंद्रकांत महाराज साखरी,व (गुरुवर्य झेंडू जी महाराज यांच्या परंपरेतील मुख्य सेवक) ह भ प वारकरी रत्न भरत महाराज बेडी कर यांचे काल्याचे किर्तन आयोजित केलेले आहे दि २५ एप्रिल २०२४ रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम ( गाव पंगत ) आयोजित करण्यात आलेली असून समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची नम्र विनंती श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ राजोरा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!