धम्म परिषदांतून बौद्ध धम्म टिकून आहे : जयसिंग वाघ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


  जळगाव :-  सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी सलग पंचेचाळीस वर्षे आपल्या तत्त्वांचा प्रचार , प्रसार केला त्यांच्या महापरिनिर्वाण नंतर ज्या बौद्ध धम्म परिषदा झाल्या त्यातून बौद्ध तत्वे संकलित करण्यात आली ती संकलित तत्वे आजतागायत टिकून आहे म्हणून बौद्ध धम्म जगात टिकून आहे म्हणून बौद्ध धम्मात धम्म परिषदांना अनन्य साधारण महत्व आहे असे स्पष्ट प्रतिपादन साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले .[ads id="ads1"]  

         पिंप्राळा हुडको येथील बुद्ध विहारात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करतांना वाघ बोलत होते . ६ ऑक्टोबर रोजी आयोजित राज्यसतरीय बौद्ध धम्म  परिषदेच्या यशस्वितेसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली होती .[ads id="ads2"]  

       जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या मार्गदर्शनात सांगितले की , धम्म परिषदेत धम्म रॅली , धम्मप्रवचन , 

उदघाटन सत्र, दोन चर्चा सत्रे , समारोप सत्र अश्या कार्यक्रमांचे आयोजन केले जावे , धम्म परिषदेत बौद्ध विचारांवर चर्चा होवून एक प्रकारे प्रशिक्षित कार्यकर्ते तयार व्हावे , इतर धर्मावर टीका टिपनी न करता बौद्ध धर्माचाच प्रचार , प्रसार होईल यावर लक्ष केंद्रित व्हावे या करिता सर्व जनतेचे सहकार्य घ्यावे .

    परिषदेचे    संयोजक तथा समता सैनिक दलाचे  राज्य संघटक विजय निकम यांनी धम्म परिशदेमागील भूमिका विषद करून निमंत्रित मान्यवर कोण कोण असावे , चर्चेचे विषय कोणते असावे या विषयी माहिती देवून लवकरच पुढील बैठक घेवून निर्णय घेतले जातील असे सांगितले .

       सुरवातीस सदानंद सपकाळे यांनी बुद्ध वंदना घेतली , विनोद निकम यांनी सूत्रसंचालन , गौरव सुरवाडे यांनी प्रास्ताविक , भोजराज सोनवणे यांनी स्वागत तर प्रमोद अवचारे यांनी आभार व्यक्त केले . बैठकीस बहुसंख्य उपासक हजर होते .

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!