यावल ( सुरेश पाटील )
सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यात सर्रासपणे मूल्यवान वृक्षांची वृक्षतोड सुरू आहे, यावल वन विभागाने काल दि. १ एप्रिल २०२४ रोजी रात्री अंदाजे बाजार भावाप्रमाणे २ लाख रुपये किमतीचे खैर जातीचे लाकूड जप्त केले परंतु वृक्षतोड करणारे आरोपी मिळून न आल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे खात्रीलायक वृत्त असले तरी सातपुडा जंगलात तथा यावल तालुक्यात सागवानी खैर व इत्यादी वृक्षतोड होत असताना सातपुड्या डोंगराप्रमाणे वन विभागातील काही ठराविक अधिकारी कर्मचारी सुद्धा आपले कर्तव्य करताना तटस्थ भूमिका निभावत आहेत का... याबाबत सातपुडा डोंगर परिसरातील नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
यावल पश्चिम वन क्षेत्राच्या सामूहिक गोष्टी पथक हे गस्त करीत असताना नाल्यात अवैध्यरित्या तोड केलेला खैर मिळून आला.वृक्षतोड झाल्यानंतर गस्ती पथकाला खैर जातीचे वृक्षतोड झालेली लाकडे मिळून येतात आणि आरोपी फरार होतात,वृक्षतोड करताना गस्ती पथकाला कोणी आढळून येत नाही का..? सातपुडा जंगलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच वृक्षतोड होत असल्याचे सुद्धा दबक्या आवाजात बोलले जात असून काल काल खैर जातीचे लाकूड जे जमा करण्यात आले ते जमा केल्यानंतर जप्त मालावर "जप्त शिक्का " वनपाल,वनरक्षक संबंधित वनक्षेत्रपाल किंवा गस्तीपथक RFO यांच्यापैकी कोणी मारला..? माल केव्हा जप्त केला..? किती वाजता ताब्यात घेतला. इत्यादी माहिती प्रसिद्धी माध्यमापासून लपविण्याचे कारण काय..?[ads id="ads2"]
वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की पश्चिम क्षेत्राच्या वन विभागाचे पथक हे सामुहिकरित्या गस्तीवर असतांना त्यांना दि. १ एप्रिल रोजी निंबादेवी जंगल परिसरात अवैद्यरित्या तोड केलेले खैर जातीचे वृक्षाची तोड करून टाकलेले लाकुड बेवारस अवस्थेत दिसुन आले. या वेळी वन विभागाच्या कर्मचारी यांनी आजूबाजूस फिरून पाहणी केली असता त्या ठीकाणी मात्र आरोपी मिळून आला नाही असे सांगण्यात येत आहे. सदरील मुद्देमाल मोजमाप केले असता खैर जाती असुन त्याची संख्या नग ५१ घन मिटर असून, एकुण शासकीय किंमत २५५८४ इतकी असून बाजारात अंदाजे २ लाख रुपये किंमत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.



.jpg)