मारूळ येथील अवैध धंदे बंद करण्याची महिलांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल  ( सुरेश पाटील ) तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मारूळ या गावात रमजान चे पवित्र सण असताना देखील मोठ्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून सर्वत्र सट्टा,मटका खेळला जात असून गावात गावठी दारूची विक्री खुलेआम विक्री करण्यात येत असून हे धंदे पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी अशी मागणी फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्याकडे मारूळ गावातील महिलांनी निवेदनद्वारे केली आहे.[ads id="ads1"]  

   मारूळ तालुका यावल येथे अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर गावात सार्वजनिक ठिकाणी सट्टा मटका घेतला जात असून त्याच बरोबर अवैध गावठी दारू देखील सर्रासपणे विकली जात आहे सध्या मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान महिना सुरू असून समाज बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येतआहे असे असताना देखील अवैध धंदेवाले हे कोणालाही न जो मानता खुलेआम गावात ठिकठिकाणी अनेक ठिकाणी टपऱ्यावर सट्टा मटका व गावठी दारू ही विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे दरम्यान या बिनधास्तपणे विक्री होणाऱ्या दारुमुळे व्यसनाधीन झालेले अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाला त्यांच्या उपासमारीची वेळ येऊन त्यांचे कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे याकडे पोलिसांचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे[ads id="ads2"]  

नाममात्र होते कारवाई- एखाद्या वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाल्यास अथवा कोणी तक्रार केल्यास पोलीस प्रशासनाकडून केवळ देखाव्यासाठी आणि वर्तमानपत्रातून बातमी आली म्हणून कारवाई करावी लागते असे कारण सांगून विक्रेत्यांवर किरकोळ कारवाई म्हणून पोलीस ठाण्यात बोलवून कारवाई केली जाते यामध्ये भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांच्या जास्त समावेश असतो तसेच वरिष्ठांना कारवाई केल्याच्या अहवाल पाठवला जातो कारवाई केल्यानंतर लगेच दोन चार आठ दिवसात जागेत बदल करून दारू विक्रेत्यांच्या व्यवसाय सुरू होतो अशी चर्चा आहे तरी पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावीत अशा मागणीचे निवेदन फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना देण्यात आले निवेदनावर लता सिताराम तायडे,पिंकी मिलन तायडे, शारदा ईश्वर तायडे, पुष्पाबाई तायडे,मराबाई शिमरे,बेबाबाई गावडे,राजू बाई कोळी, उषाबाई कोळी,मुंजूला बाई शिमरे,संगीताबाई कोळी, यांच्यासह रिपाई आठवले गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष राजू रमजान तडवी,संजय तायडे,व हिरामण पाटील यांच्या स्वाक्षरी आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!