सावदा ता. रावेर ( वार्ताहर ) येथून जवळच असलेल्या कोचुर बु॥ ता रावेर येथील रहिवासी सेवानिवृत्त पोस्टमास्तर श्री कडू दिपचंद पाटील यांची नात तर स्वर्गीय. नंदकिशोर कडू पाटील यांची कन्या कुमारी युक्ता नंदकिशोर पाटील हीने पुणे येथील प्रतीथ यश बी.जे. मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण करून सुयश संपादन केले आहे.[ads id="ads1"]
सदर युक्ता पाटील हीचे पितृछत्र हरवलेले असतांनाही तीने स्वताच्या जिद्दीने व मेहनीतीने हे मोठे यश संपादन केले असून एका छोटयाशा कोचुर बु॥ या खेडेगावाचे नाव रोशन केले आहे . तीच्या या यशाबद्दल येथील माजी सरपंच तथा पत्रकार रविभाऊ महाजन .गोपाळ दादा पाटील . मुरलीधर पाटील .( MK ) प्रकाश वसंत राऊत. मिलींद पाटील . मोहन पाटील . शैलेंद्र पाटील . यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे .



