रावेर लोकसभा मतदार संघातील समस्यांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांची चुप्पी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


व्हाट्सअप,फेसबुकमुळे प्रिंट मीडियाचे महत्व झाले कमी

यावल ( सुरेश पाटील ) रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी मात्र अद्याप मतदार संघातील 50% क्षेत्रात  फक्त लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या समर्थकांचा मर्यादित प्रमाणात राजकीय गोंधळ सुरू आहे.रावेर लोकसभा मतदार संघात शेतकऱ्यांच्या केळी व कापूस पीक भावा संदर्भात व इतर अनेक अडचणींच्या समस्यां आणि नागरिकांच्या उद्योजकांच्या आणि सुशिक्षित बेरोजगार,मजूर वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक, ठेवीदारांच्या, कर्जदार,सहकारी संस्थांच्या,शैक्षणिक संस्थांबाबत,आणि बंद पडलेल्या मधुकर सहकारी साखर कारखाना,सुतगिरणी, आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी संस्था यांच्या काय, काय अडीअडचणी अनेक समस्याबाबत मात्र विरोधक व सत्ताधारी गटामध्ये कमालीची चुप्पी असल्याने मतदार आणि नागरिक संभ्रमात असून त्यांचे समर्थक मात्र आपापल्या उमेदवारांच्या विजयाबाबत वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात आत्मविश्वास व्यक्त करीत असले तरी लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक व्हाट्सअप फेसबुक इत्यादी माध्यमातून मर्यादित प्रसिद्धी करून घेत आहे,आणि ही राजकीय धूर्त चाणक्य नीती राजकीय परिस्थितीत ठराविक आरोप प्रत्यारोप उमेदवार निवडून येण्यासंदर्भात फक्त जाहीरपणे तोंड सुख घेऊन समस्यांबाबत झालेल्या गैरप्रकार भ्रष्टाचार विरोध करणे बाबत कोणीही ( काही सामाजिक संघटना आणि काही समाजसेवक हे पण )  बोलायला तयार नाही ही रावेर लोकसभा मतदारसंघातील वस्तुस्थिती असताना मात्र या सर्व घडामोडी बाबत विरोधक आणि सत्ताधारी आणि त्यांचे काही खास समर्थक प्रिंट मीडिया व त्यांच्या प्रतिनिधी पासून चार हात लांब का आहेत..? हे सुद्धा मतदारांना नागरिकांना ज्ञात असले तरी लोकप्रतिनिधींना याचे महत्त्व त्यांना निवडणूक निकालानंतर  लक्षात आल्याशिवाय राहणार नाही असे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads1"] 

  कारण प्रिंट मीडिया व त्यांचे प्रतिनिधीचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधी का व कशासाठी करीत आहेत..?  व्हाट्सअप फेसबुक माध्यमातून अल्प प्रमाणातच मतदार जागृती होणार असल्याने ज्या मतदार बंधू-भगिनींना व्हाट्सअप फेसबुक यांचे पूर्ण ज्ञान नाही  त्याचा विपरीत परिणाम मात्र लोकप्रतिनिधींच्या मतदानावर झाल्याशिवाय राहणार नाही कारण जनतेचा,नागरिकांचा, मतदारांचा ९० ते ९५ टक्के विश्वास हा फक्त डिजिटल मिडिया,प्रिंट मीडियावर आहे.[ads id="ads2"]  

      रावेर लोकसभा मतदारसंघात विरोधक आणि सत्ताधारी उमेदवारांचे काही कट्टर समर्थक राजकारणात कोणामुळे आणि कशामुळे मोठे झाले आहेत हे त्यांच्यासह सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात असल्याने ते प्रत्यक्षात कोणामागे फिरत असले तरी प्रत्यक्षात चाणक्य नीतिचा वापर करून ते कोणाचे काम करणार आहेत हे मतदारांना चांगल्या प्रकारे ज्ञात असून त्याचा अनुभव सुद्धा आहे  ९० % समर्थक हे राजकारणाचा अभ्यास करून चालू गाडीत बसून वैयक्तिक,राजकीय, स्वार्थ साधण्यासाठी म्हणजे लोकसभेत कोणाची सत्ता येणार त्या बाजूनेच मतदान प्रक्रियेत सक्रिय राहतील असे बोलले जात आहे कारण त्यांना सर्वतोपरी विकास करून घ्यायचा असतो आणि आहे. कोणत्या उमेदवाराच्या मागे कोण कोणत्या लालसे मुळे आणि स्वार्थामुळे फिरत आहे हे फक्त प्रिंट मीडियातूनच उमेदवारांना समजू शकते.  

  व्हिडिओ बातमी   👉 एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मंत्री गिरीष महाजन काय म्हणाले

   सत्ताधारी आणि विरोधक  हे जाहीरपणे आपल्या विरोधी उमेदवाराबाबत किंवा आपण मतदारसंघात कोणकोणती ठोस कामे करणार आहेत..? किंवा जी चुकीची कामे झाली आहेत त्याबाबत कोणीही खडे बोल बोलण्याची हिम्मत  का करीत नाही..? हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये उपस्थित केला जात आहे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर का आणत नाही..? एकाच माळेचे मणी आहेत का..? किंवा आपले विविध हेतू साध्य करण्यासाठी उद्योग सुरू राहण्यासाठी समन्वय साधला जात आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न रावेर लोकसभा मतदारसंघात उपस्थित केले जात असले तरी विरोधक आणि सत्ताधारी उमेदवारांनी प्रिंट मीडिया व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन नागरिकांमध्ये मतदारांमध्ये जनजागृती केल्यास त्यांना नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!