अवैध वाळू विक्रेत्यांनी स्वतः वाळू वाहतूक करणारे डंपर पकडून तहसील आवारात जमा केले : वाळू विक्रेत्यांचा वाद महसूलच्या पथ्यावर...!

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल ( सुरेश पाटील )

आप आपसातील भांडण आणि गैरसमज झाल्याने वाळू विक्रेत्यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर स्वतः पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केल्याने यावल महसूल व वाळू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि ही घटना महसूल विभागाच्या पथ्यावर पडली.

     सदरची सिनेमा स्टाईल घटना आज शनिवार दि.२७ रोजी सकाळी ५:३० ते ६:३० वाजेच्या सुमारास यावल अट्रावल या जुन्या रस्त्यावर घडली आणि तेथून ते डंपर दुसऱ्याच वाळू विक्रेत्यांनी यावल तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची माहिती यावल येथील तलाठी ईश्वर कोळी,डो.कठोरा तलाठी वसिम तडवी,साकळी तलाठी

मिलिंद कुरकुरे,बोरखेडा तलाठी शरीफ तडवी यांच्याकडून मिळाली. डंपर मध्ये कमी प्रमाणात वाळू असून वाळूचे डंपर वाळू विक्रेत्यांनीच यावल तहसील कार्यालयात जमा केल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. [ads id="ads1"]  

      याबाबत कानोसा घेतला असता वाळू विक्रेत्यांमध्ये आप-आपसात,भांडण तंटा गैरसमज आणि वाळू वाहतूक ठिकाणावरून वाळू भरण्याच्या कारणावरून २ वाळू वाहतूक डंपर चालक मालक यांच्यात वाद निर्माण झाला. वाळू डेपोच्या ठिकाणी एकाचे वाळू वाहतूक डंपर वाळू विक्रेत्यांनी ताब्यात घेतले आणि त्याचा विपरीत परिणाम दुसरे डंपर वाळू विक्रेत्यांनी पकडून यावल तहसील कार्यालयात जमा केले. जे डंपर केले त्या डंपर चालक मालकावर लाखो रुपयाची दंडात्मक कारवाई होणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. [ads id="ads2"]  

     वाळू वाहतूकदारांमध्ये तीव्र संताप -- अवैध वाळू वाहतूक करताना अवैध वाळू वाहतूकदारांना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे त्यांच्यासह महसूल पोलीस प्रशासनास सर्वांना ज्ञान आहे वाळू विकत घेणारे बांधकाम करणारे सुद्धा वाळू घेतल्यानंतर वाळू वाहतूकदारांना वाळूची ठरलेली रक्कम वेळेवर देत नसल्याने वाळू वाहतूकदारांना मोठा संघर्ष करावा लागत असून आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते,त्यामुळे संपूर्ण वाळू वाहतूकदार त्रस्त झाले आणि त्यांच्या कमाईवर विपरीत परिणाम होत असल्याने यापुढे मोठी अप्रिय घटना घडू शकते.

व्हिडिओ बातमी   👉 एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मंत्री गिरीष महाजन काय म्हणाले

त्यामुळे वाळू वाहतूकदारांनी आप - आपसात संघर्ष भांडण तंटे न करता आपले उद्योग समन्वयाने करायला पाहिजे कारण आज जमा केलेले डंपर चालक मालक यांनी यावल तहसील कार्यालयात अवैध वाळू वाहतूक संदर्भात बंद केला असल्यास त्यास मोठा आर्थिक फटका बसेल..? असे सुद्धा बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!