यावल ( सुरेश पाटील ) जळगाव जिल्ह्यात एफसीआय गोदामातून दर महिन्याला रेशन धान्य मालाचा धान्यसाठा मोठा ट्राला आणि मिनी ट्रकच्या माध्यमातून वाटप केला जातो हा धान्यसाठा वाटप करताना मोठ्या प्रमाणात मापात पाप केले जात असल्याने गोदाम व्यवस्थापक आणि रेशन दुकानदाराला धान्य वाटप करताना मोठी कसरत करावी लागत असून ग्राहकांच्या कसोटीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे जिल्हाधिकारी जळगाव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एफसीआय गोदामातून धान्य साठा घेऊन जाणाऱ्या वाहनाची अचानक तोल काट्यावर मोजणी करून खात्री केल्यास दर महिन्याला ६० ते ७० लाख रुपयाची हेराफेरी बंद होईल आणि एका ट्रॉला मागे दोन ते अडीच क्विंटल वजनात मापात पाप कसे केले जाते हे उघडकीस येईल.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव जिल्ह्यात एकूण १७ शासकीय गोदामे आहेत या सर्व गोदामात रेशन धान्यसाठा पुरवठा करण्यासाठी दररोज जळगाव येथून एफसीआय गोदामातून सरासरी ५ रेशन धान्य साठा वाटप करणारी वाहने धान्यसाठा घेऊन निघत असतात ( १७ गोदामासाठी ५ वाहने ) असे एकूण अंदाजे २० दिवसात १७०० वाहने धान्यसाठा प्रत्येक शासकीय गोदामात पोहच करीत असतात.
एका ट्रॉलामध्ये अंदाजे २५० ते ३०० क्विंटल गहू किंवा तांदूळ धान्यसाठा शासकीय गोदामात पोहोच केला जात असताना एका ट्रालात अंदाजे दोन ते अडीच क्विंटल धान्य वजनाने कमी असतो म्हणजे मापात पाप होत असते,धान्य साठा कमी मिळत असल्याने जिल्ह्यातील १७ गोदाम व्यवस्थापकाला रेशन दुकानदाराना धान्य वाटप करताना आणि रेशन दुकानदाराला आपल्या प्रत्येक कार्डधारकास धान्य देताना मोठी कसरत आणि ग्राहकाच्या कसोटीशी सामना करावा लागतो हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असले तरी या वस्तुस्थितीकडे जिल्ह्यातील संपूर्ण शासकीय यंत्रणेचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्यात दर महिन्याला अंदाजे ३ हजार ते ३ ४०० क्विंटल धान्यसाठा ( अंदाजे ६० ते ७० लाख रुपये किमतीचा ) शासकीय गोदामा व्यवस्थापकाला कमी मिळत असतो.[ads id="ads2"]
जळगाव जिल्ह्यातील १७ गोदाम व्यवस्थापकांना दर महिन्याला अंदाजे तीन हजार चारशे क्विंटल धान्यसाठा कमी मिळत असल्याने हा धान्यसाठा नेमका कोणाच्या घशात जातो..? तसेच एफसीआय गोदामातून धान्यसाठा घेऊन जाणारे वाहनात प्रत्यक्ष धान्य किती क्विंटल आहे याची खात्री कोण करीत असतो..? जिल्हाधिकारी जळगाव किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांनी आतापर्यंत एफसीआय गोदामातून निघालेल्या वाहनाची अचानक तपासणी केव्हा कुठे आणि कोणत्या तोल काट्यावर केली..? आहे किंवा नाही..? करणार आहेत किंवा नाही..? आणि आतापर्यंत धान्य साठा वाहतूक वाहनाची तपासणी का केली नाही..? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी जिल्हाधिकारी जळगाव,आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एफसीआय गोदामातून निघालेल्या वाहनाची अचानक रस्त्यात तपासणी केल्यास, वजन माप केल्यास रेशन धान्य साठा वाटप करतानाची हेराफेरी उघड झाल्याशिवाय राहणार नाही असे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
गोदाम व्यवस्थापकांच्या मासिक आढावा बैठकीत जिल्ह्यातील अनेक गोदाम व्यवस्थापकांनी धान्यसाठा कमी मिळत असल्याबाबत तोंडी किव्वा लेखी तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे केल्या आहेत किंवा नाही आणि केल्या असतील तर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी काय कार्यवाही केली..? याबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यात धान्यसाठा वाटप करताना मापात पाप होत आहे त्याबाबत लक्ष केंद्रित न केल्यास वाहनाची अचानक तपासणी न केल्यास, गोदाम व्यवस्थापकांना धान्यसाठा वाटप करताना धान्यसाठा कमी न मिळता आवश्यक त्या मापातच मिळाला पाहिजे याबाबत कार्यवाही न झाल्यास त्यांच्याविरुद्ध भारतीय जनसंसद जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश जगन्नाथ पाटील रीतसर लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.