रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील रावेर तालुका शेतमाल संस्थेत तज्ञ संचालकपदी येथील चंद्रकांत विचवे व येथिल प्रकाश आनंदा पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन, येथिल संस्थेच्या कार्यालयात दि.१० रोजी बुधवारी चेअरमन सोपानदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत, याबाबत जाहिर करण्यात आले. [ads id="ads1"]
यावेळी व्हा.चेअरमन किशोरदादा पाटील, संचालक धनजीसेठ लढे, मुरलीधर तायडे,ज्ञानेश्वरभाऊ महाजन,यशवंतराव पाटील,दिलीपदादा पाटील, जिजाबरावदादा चौधरी,ईश्वरभाऊ निळे, सचिव नंदलाल वाणी उपस्थित होते.निवडीनंतर चेअरमन व सर्व संचालक कर्मचारी यांचे आभार तज्ञ संचालक प्रकाश पाटील व चंद्रकांत विचवे यांनी मानले.



