१५ हजाराची लाच घेताना महिला ग्रामसेविकेस रंगेहात पकडले : धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिच्या राहते घरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) धुळे जिल्ह्यातील चौगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत महिला ग्रामसेविका राजबाई पाटील यानां १५ हजार रुपयाची लाच घेताना धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने पकडल्याने संपूर्ण धुळे जिल्ह्यात जिल्हा परिषद व ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,ग्रामपंचायत,मौजे चौगांव बा. ता.शिंदखेडा जि.धुळे येथील ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तकारदार यांचेकडुन १५ हजार रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वत: स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुछ्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]  

    तकारदार यांनी ग्रामपंचायत चौगांव बु.येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत पेव्हर ब्लॉकबसविण्याचे काम घेवून ते काम पूर्ण केले असून सदर कामावर झालेल्या खर्चाचे बिल तक्रारदार याना अदा करण्यात आले होते.तसेच तकारदार यांनी मौजे चौगांव ब.येथे रस्ता सिमेंट कॉक्रीटीकरणाचेकाम केले असुन त्या कामाकरीता झालेल्या खर्चाचे बिल त्यांना अदा करण्यात आलेले नव्हते म्हणुन तक्रारदार यांनी सुमारे १ महिन्यापुर्वी ग्रामसेविका राजबाई पाटील यांची भेट घेवुन त्यांनी केलेल्या रस्ता सिमेंट कॉकीटीकरणाच्या कामावर झालेल्या खर्चाचे बिल अदा करण्याची विनंती केली असता ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तकारदार यांच्याकडे रस्ता कॉकीटीकरणावर झालेल्या खर्चचि बिल काढण्याकरीता तसेच तकारदार यांनी यापूर्वी केलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामाचे बिल कादून दिल्याचे मोबदल्यात तकारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याने तकारदार यांनी ला.प्र.वि.धुळे कार्यालयाकडे दि. ४ एप्रिल २०२४ रोजी तकार दिली होती.

सदर तकारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान ग्रामसेविका राजबाई पाटील यांनी तकारदार यांच्याकडे २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले होते.त्या अनुषंगाने आज सोमवार दि.१५ एप्रिल २०२४ रोजी सापळा कारवाई दरम्यान तकारदार यांचेकडुन १५,०००/- रुपये लाचेची रक्कम त्यांचे शिंदखेडा येथील राहते घरी स्वत: स्विकारतांना ग्रामसेविका राजबाई पाटील यांना रंगेहात पकडण्यातआले असुन त्यांचे विरुध्द शिंदखेडा पो.स्टे.येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचेकाम सुरु आहे.[ads id="ads2"]  

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी,तसेच राजन कदम, मुकेश अहिरे,मकरंद पाटील, प्रविण पाटील,संतोष पावरा, प्रविण मोरे,रामदास बारेला, प्रशांतत बागुल,सुधीर मोरे व जगदीश बडगुजर, मपोकॉ. दिपाली सोनवणे या पथकाने केलीआहे.

        सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिंबधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीसअधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!