१ जेसीपी, २ डंपर, १ ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा.
यावल ( सुरेश पाटील )
आज मंगळवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अंजाळे गावाजवळ मोर नदीच्या नवीन पुलाखाली आणि जुन्या पुलाजवळ गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर फैजपूर उपविभागीय पोलिस आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णासिंग यांनी कारवाई करून १ जेसीपी, २ डंपर, १ ट्रॅक्टर यावल पोलिसात जमा केल्याने महसूल विभागासह पोलीस दलात व अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली.[ads id="ads1"]
यावल आणि अंजाळे मंडळात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अवैध वृक्षतोड करून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. अवैध व्यावसायिक संबंधित महसूल अधिकारी,कर्मचारी यांच्यावर पाळत ठेवून अधिकारी,कर्मचारी शासकीय कोणत्या कामात, मीटिंगमध्ये व्यस्त आहे आणि राहणार आहेत याचा अंदाज घेऊन अवैध गौण खनिज, अवैध वृक्षतोड करून सर्रासपणे वाहतूक करीत असतात याला काय म्हणावे..?[ads id="ads2"]
याचाच एक नमुना आज प्रत्यक्षात समोर आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तहसील कार्यालयात आज यावल तहसीलदार यांनी पत्रकार परिषदेची आणि बीएलओ कर्मचाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती तहसीलदार या आपल्या कामात व्यस्त असल्याचे निमित्त साधून अंजाळे येथील मोर नदी पुलाजवळ अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या टोळीने आपला उद्योग सुरू केला असता फैजपूर पोलीस उपविभागीय आयपीएस महिला अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांनी अचानक घटनास्थळी धाव घेऊन अवैध गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणाऱ्याच्या तयारीत असलेले एक जेसीबी दोन डंपर एक ट्रॅक्टर यावल पोस्टला जमा केली याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी याबाबत ७ जणांविरुद्ध अवैध गौण खनिज चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. या कारवाईमुळे मात्र महसूल पोलीस आणि गौण खनिज व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.