कॅन्टीन परिसरात ४ चाकी एअर कंडिशन वाहनात बसून अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारा कोण..?
यावल ( सुरेश पाटील ) जिल्ह्यात रेशन धान्य वाटपाच्या मापात पाप दर महिन्याला ६० ते ७० लाखाची हेराफेरी,जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी गोदामातून निघालेल्या वाहनाची अचानक तपासणी केव्हा करणार..? असे वृत्त दैनिक साईमत मध्ये आज प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असली तरी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या कॅन्टीन परिसरात चार चाकी एयर कंडीशन वाहनात बसून संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पुरवठा विभागावर आणि अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवणारा तो " धनवान शेठ " कोण याबाबत आता जिल्ह्यातील महसूल विभागात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.[ads id="ads1"]
जळगाव जिल्ह्यात रेशन धान्य वाटपाच्या मापात दर महिन्याला ६० ते ७० लाखाची हेराफेरी असे वृत्त प्रसिद्ध झाल्याने जिल्ह्यातील सर्व गोदाम व्यवस्थापक आणि रेशन दुकानदारांमध्ये सकारात्मक रित्या बोलले जात असून एफसीआय गोदामातून निघालेल्या राज ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वाहनांसोबत धान्य साठा पुरवठा करण्यासंदर्भात जी काटा पावती असते त्यानुसारच गोदाम व्यवस्थापकाला रेशन धान्यसाठा ताब्यात घ्यावा लागतो ही वस्तुस्थिती आहे. धान्यसाठा वाहतूक वाहनासोबत धान्य साठ्याची वजन काटा पावती वाहनासोबत असली तरी त्या वजन काटा पावती प्रमाणे प्रत्यक्षात धान्याचे वजन कमी प्रमाणात असते धान्यसाठा कमी प्रमाणात कसा कोठून कोणाच्या मार्गदर्शनाखाली येतो तसेच एफसीआय गोदामात जो टोलकाटा वजन काटा आहे त्या वजन काट्यावर मोजलेला धान्यसाठा शासकीय गोदामा पर्यंत पोहोचतो त्यावेळी कमी कसा होतो.? एफसीआय गोदामात असलेल्या टोलकाट्याची वजन मापे निरीक्षक यांच्याकडून केली आहे किंवा कसे..? किंवा टोल काट्यामध्ये काही ॲडजस्टमेंट कोणी व का आणि कशासाठी केली.? आणि त्यातून काट्यावर धान्यसाठा मोजल्या नंतर जिल्ह्यात ज्या गोदामात धान्यसाठा पोहोच केला जातो किंवा दुकानात पोहोच केला जातो त्या ठिकाणी तो धान्यसाठा कमी का भरतो..? हा संशोधनाचा विषय आहे. एफसीआय गोदामातून जिल्ह्यातील शासकीय गोदामात रेशन धान्यसाठा पोहोच करताना वाहनासोबत जी काटा पावती असते त्या वाहनाची तपासणी जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव,किंवा स्थानिक पुरवठा अधिकाऱ्यांनी काटा पावती प्रमाणे दुसऱ्या खाजगी वजन काट्यावर टोल काट्यावर खात्री करून काटा पावती प्रमाणेच प्रत्यक्षात वाहनात घालण्यासाठी आहे किंवा नाही याची खात्री करायला पाहिजे. [ads id="ads2"]
संपूर्ण जळगाव जिल्ह्यात शासकीय गोदामापर्यंत रेशन धान्य साठा वितरित किंवा पोच करण्यासाठी लातूर येथील राज ट्रान्सपोर्ट कंपनीला ठेका दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे या ठेकेदाराचे काम जळगाव जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात कोण बघतो ? आणि दर महिन्याला वजनात मापात पाप करणारा कोण? गोदाम व्यवस्थापकाला,रेशन दुकानदारांना धान्यसाठा कमी देण्याचे कारण काय? धान्यसाठा पोहोच करणारा गोदाम व्यवस्थापकांना आणि रेशन दुकानदारांना सांगत असतो की मुझे सबको देखना पडता है,सबको मॅनेज करता हू मेरे उपर कोई कारवाई नही कर सकता असे सांगून जळगाव जिल्ह्यात धनवान होणारा तो कोण? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने जिल्हाधिकारी जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी जळगाव यांनी एफसीआय गोदामातून धान्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाची कुठेही अचानक तपासणी करून त्या वाहनासोबत असलेल्या काटा पावती प्रमाणे त्या वाहनात प्रत्यक्षात तेवढ्या वजनाचे धान्य साठा आहे किंवा नाही याची खात्री करून रेशन धान्य साठा पुरवठा करण्याची प्रक्रिया पारदर्शीपणाने राबविण्याबाबत तात्काळ ठोस कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.



.jpg)