यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यात वन विभाग व महसूल कार्यालयापासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर मोठी वर्दळ असलेल्या रस्त्याच्या बाजूला बेकायदेशीर एका भल्या मोठ्या जिवंत वृक्षाची तोड करताना आढळून आल्याने आज यावल पूर्व क्षेत्रपाल यांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केली.[ads id="ads1"]
आज मंगळवार दि.२३ एप्रिल २०२४ सकाळी ,९ वाजेच्या सुमारास डोंगर कठोरा रस्त्याचे बाजूला असलेल्या एका मोठ्या जिवंत हिरवे कच लिंबाचे झाडाची अत्याधुनिक मशनरीच्या साह्याने तोड सुरू होती याची सूचना यावल येथील एका व्यक्तीने यावल महसूल व वन विभागाला दिल्याने दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत आपल्या वनविभाग कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पुढील कारवाई सुरू केली. अशाप्रकारे अवैध बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी रास्ता अपेक्षा तालुक्यातून व्यक्त होत आहे.


