यावल ( सुरेश पाटील )
यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई होऊ नये म्हणून तसेच यावल नगरपालिकेत ठेकेदारांमार्फत जे मजूर कामावर घेतले जातात त्यांच्या टाळूवरील लोणी खाता यावा म्हणून त्यांना तात्काळ कामावर घेण्यासाठी यावल तालुक्यातील एक स्थानिक दलालाने आणि ऐका राजकीय नेत्याच्या पीए मार्फत लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना एका भावी लोकप्रतिनिधीच्या नावाने भ्रमणध्वनीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यावल महसूल आणि नगरपालिका प्रशासनावर शासकीय आणि राजकीय प्रभाव आणि दबाव गेल्या आठवड्यात कशाप्रकारे टाकला तसेच त्या मध्यस्थी दलालाने एका भ्रष्टाचारी गैरप्रकार करणाऱ्या अभियंत्यापुढे लाचारीचे लोटांगण घालून चर्चा करून आपला आर्थिक हेतू सिद्ध करून कशा प्रकारे चमकोगिरी करून घेतली याबाबत राजकारणात,नगरपालिका क्षेत्रातसह यावल तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. भ्रमणध्वनीची चौकशी झाल्यास आचारसंहितेचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो असे जिल्ह्यात बोलले जात आहे.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यात शहरात अवैध धंदे करणाऱ्याचा एक मध्यस्थी प्रतिनिधी दलाल निर्माण झाला आहे तो संबंधीताची दिशाभूल करीत अधिकाऱ्यांशी,काही मंत्री आणि त्यांचे काही पीए यांच्याशी माझे चांगले हित संबंध आहेत मी सांगितल्यावर असे होईल तसे होईल अशा थापा मारून माझे सर्वांशी चांगले हित संबंध आहेत अशा थापा मारत असतो अशाच प्रकारे त्या थापाड्याने भावी लोकप्रतिनिधीची आणि एका मंत्री महोदयाच्या पीएची शुद्ध दिशाभूल करीत जिल्हाधिकारी जळगाव यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून यावल नगरपालिकेतील मजूर कॉन्ट्रॅक्टर तत्त्वाचा विषय आणि अवैध गौण खनिज वाहतूकदारांवर कारवाई होऊ नये म्हणून कान भरण्यात आले त्यानुसार जिल्हाधिकारी जळगाव यांनी एका तालुकास्तरीय पदाधिकाऱ्याला भ्रमणध्वनी वरूनच संपर्क साधून काही विषय असल्यास माझ्याकडे मांडा मी त्यातून नक्की मार्ग काढेल असे सांगितल्याने पर्यायी आचारसंहिता सुरू असताना यावल महसूल व नगरपालिका अधिकाऱ्यांवर बेकायदा राजकीय प्रभाव आणि दबाव टाकल्याने तो मध्यस्थी दलाल प्रतिनिधी थापाड्या माझ्यामुळे ही कार्यवाही झाल्याचे दबक्या आवाजात तालुक्यात बोलत आहे,त्या थापाड्याला असे वाटते की मी काय करतो ते कोणाला ( मांजर डोळे मिटून दूध पिऊन घेते तिला असं वाटते मला कोणी बघत नाही ) समजत नाही,असे त्यांने समजून घेऊ नये.[ads id="ads2"]
तालुक्यात नगरपालिकासह सर्व शासकीय विभागातील काही बोगस कामांबाबत आणि लाच खाऊ वृत्तीमुळे अनेक ग्रामस्थांच्या व शहरातील नागरिकांच्या लेखी तक्रारी आहेत काही भ्रष्टाचारी गैरप्रकार करणाऱ्या काही ठराविक अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांच्या संपर्कात असणारे दलाल प्रतिनिधींना मात्र आता दोन नंबरच्या हड्ड्या खाऊन तसेच नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने मार्च एंडिंग संपल्याने अधिकाऱ्याबाबत सहानुभूती निर्माण झाली आहे.लाचारीचे आणि भ्रष्टाचाराचे गैरप्रकाराचे लोटांगण घालणाऱ्यांना त्या प्रतिनिधीला मात्र आता माहिती अधिकाऱ्या मोठा धाक निर्माण झाला आहे.कारण माहिती अधिकारामुळे एखाद्या अपात्र धनदांडग्या लाभार्थ्याचे रेशन सुद्धा बंद होऊन त्याच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते आणि ते निश्चित आहे अशी त्याला खात्री निर्माण झाली असेल ...? त्यांना सांगावेसे वाटते जर चुकीची कामे केली नसली तर कोणत्या अधिकाऱ्यांने आणि कर्मचाऱ्यांने माहिती अधिकाराचा धाक का म्हणून बाळगावा असे सुद्धा तालुक्यातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे.