रावेर येथील सरदार जी. जी. हायस्कूलच्या रंगमंचावर फुले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे पूज्य भंते दिपंकरजी महाथेरो व ३४ श्रामणेर संघ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.[ads id="ads1"]
प्रथम गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक विवाह सोहळ्यास सुरवात झाली. पुज्य भंते दिपंकर महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील, परित्राण पाठ, जय मंगल अष्टगाथा घेण्यात आले.
संघरत्न दामोदरे यांनी प्रतिज्ञा देऊन विवाहांचे सोपस्कर पार पाडले. विवाहास भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे, यांनी ३८ उपासक, उपासिका यांचे विवाहाचे सोपस्कर पारपडले . कार्यक्रमाची भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे होते तर उद्घाटन आमदार शिरिष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले . दीप पूजा ऍडव्होकेट योगेश गजरे, एडवोकेट , एडवोकेट सुभाष धुंदले,यानी तर धुप पूजा एडवोकेट दीपक पी गाढे , संघरक्षक तायडे, ज्ञानेश्वर गाढे यांच्या हस्ते करण्यात आले.[ads id="ads2"]
यावेळी समता सैनिक जिल्हा प्रमुख युवराज नरवाडे, प्रकाश सरदार, केंद्रीय शिक्षीका लताताई तायडे आदिंच्या हस्ते करण्यात आले .
जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जळगाव, तसेच बुलढाणा, खामगाव, मलकापूर आदी ठिकाणच्या ३८ वधू- वर सहभागी झाले होते. त्याच प्रमाणे धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस सुशिल हिवाळे, माजी नगराध्यक्ष हरीश शेठ गणवानी, समाज कल्याण च्या शिला अडकमोल ,राजु सवर्णे, बाळू शिरतुरे, सावन मेढे, पंकज वाघ, दिपरत्न तायडे, केंद्रीय शिक्षक शैलेंद्र जाधव, एकनाथ गाढे, साहेबराव वानखेडे, सदाशिव निकम, उमेश गाढे, रघुनाथ कोंघे, ज्ञानेश्वर आटकाळे, बी. सी.साळुंके,अमोल हिवरे,राहूल गाढे,धनराज घेटे , कांतीलाल गाढे,विजय भोसले, राजु इंगळे, महेंद्र वानखेडे, पुंडलिक कोघे , गौतम अटकाळे,संतोष तायडे,महेंद्र तायडे,रितेश निकम, नितीन अढागळे,अनिल घेटे, प्रशिक अटकाळे नितीन तायडे,राहुल राणे,आदी उपस्थित होते . प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत विवाह समिती अध्यक्ष राजेंद्र अटकळे यांनी केले .
सुत्रसंचलन केंद्रीय शिक्षक विजय अवसरमल तर आभार राहुल गाढे यांनी मानले .