फैजपूर शहरातील तडवी समाज बांधवांच्या बैठकीचे आयोजन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


फैजपुर प्रतिनिधि (सलीम पिंजारी)

 माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्या निवासस्थानी दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी शहरातील आदिवासी तडवी बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरची बैठक पांडुरंग सराफ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.[ads id="ads1"]  

सदर बैठकीला हिरालाल चौधरी, पंडित कोल्हे, माजी मुख्याध्यापक रामदास बैरागी, पत्रकार सलीम पिंजारी, राजू तडवी समाज बांधवांची उपस्थिती होती. 

 या बैठकीमध्ये कै यशोदाबाई दगडू सराफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पंडित दीनदयाल उपाध्याय मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा पिंपरूड तालुका यावल या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे. सदरची शाळा पहिली ते बारावी पर्यंत आदिवासी मुला-मुलींना मोफत प्रवेश देणार आहे.   [ads id="ads2"]  

  सदरची शाळा ही निवासी असून मुलांची राहण्याची कपडे पुस्तके सर्व मोफत दिले जाणार आहे. इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ही माहिती देण्यासाठी शहरातील तडवी आदिवासी बांधवांची बैठकीचे आयोजन केले होते. उपस्थित समाज बांधवांना माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांनी सदरची शाळा ही अनुदानित असून सर्व खर्च शासन करणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासह त्याच्या अंगात असणारा कलागुणांना वाव देण्यात येईल व चांगल्या क्रीडा शिक्षकाची ही नेमणूक करण्यात येईल. आदिवासी बांधव हा समाजात पुढे गेला पाहिजे तो शिक्षित झाला पाहिजे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही अनुदानित मुला मुलींची शाळा सुरू करीत आहोत त्याचा रावेर यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!