यावल येथील सरदार वल्लभ भाई पटेल इंग्लिश मिडीअम स्कूलचा लागला 100% निकाल

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल  ( सुरेश पाटील )

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल गेल्या दोन वर्षाची परंपरा राखत 100% लागला असून विद्यालयातुन १७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झालेले होते त्यातील पुर्ण १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.[ads id="ads1"]  

   विद्यालयातुन उत्तीर्ण झालेले विदयार्थी खालील प्रमाणेः प्रथम क्रमांक कु.यामीनी राकेश पाटील हिला 90.60%, द्वितीय क्रमांक कु.हेमांगी खेमकांत सोनवणे हिस 89.20%,तृतिय क्रमांक  राजिक पटेल यास 87.40 % व चौथा क्रमांक अली सरवर शौकत याने  85.60% गुण मिळवत पटकवला आहे.[ads id="ads2"]  

  तर पाचवा क्रमांक माळी भावेश ऊमाकांत याने 84.80% गुणांनी पटकावला आहे.सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र महाजन सर व, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक शिला तायडे मॅडम,तसेच इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!