यावल (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि.२९ शंकरराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे यावल परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहे परंतु परीक्षा सुरू होण्याच्या एक ते दीड तास आधीच विद्यार्थ्यांना प्रश्न माहित पडत असल्याने परीक्षा केंद्रात व परीक्षा केंद्राबाहेर ठीक ठिकाणी यात्रेचे स्वरूप दिसून येत असल्याने परीक्षा केंद्रावर परीक्षा केंद्रप्रमुख यांचे आणि भरारी पथकाचे नियंत्रण आहे किंवा नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads1"]
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. जुलै १९८८ रोजी सुरू झालेल्या लोकप्रिय विद्यापीठाचे संस्थापक त्याचे मुख्यालय नाशिक येथे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू आणि सचिव आपल्या कार्य क्षेत्रातील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष ठेवून असले तरी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात यावल शहरात परीक्षा केंद्रावर जी परीक्षा सुरू झाली आहे त्या परीक्षा करण्यात परीक्षा सुरू होण्याच्या एक ते दोन तास आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका ची माहिती मिळत आहे आणि त्यानुसार उत्तर शोधाशोध करण्यासाठी आणि झेरॉक्स करण्यासाठी मोठी धावपळ विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.[ads id="ads2"]
कारण सरकारी पदांसाठी अर्ज करताना ऑनलाइन किंवा ओपन आणि डिस्टन्स लर्निंग (ODL) पद्धतींद्वारे मिळवलेल्या पदवी पूर्णपणे वैध असल्याने पात्र विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे, यात तुमचा अंतर पदवी अभ्यासक्रम वैध करण्यासाठी तुमच्या विद्यापीठाकडे UGC-DEB ची मान्यता आहे याची पुष्टी करणे आवश्यक आहे.६ डिसें, २०२३
विद्यापीठ 12 UG आणि 7 PG कार्यक्रम प्रदान करते, ज्यात BA, BSc, BCA, BCom, BBA, MA, MCom, MBA, MSc, PhD, आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. YCMOU प्रवेश काही अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गुणवत्ता आणि प्रवेश परीक्षेच्या आधारे केला जातो.किमान पात्रता असलेले विद्यार्थी 10+2 उत्तीर्ण आणि 40% ते 50% गुणांसह पदवीधर असावेत अशा विद्यापीठाच्या अटी शर्ती आहेत.
यावली येथे शंकरराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे या केंद्रावर परीक्षा सुरू० होण्याच्या आधीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना समजत असल्याने विद्यार्थी प्रश्नाचे उत्तरे शोधण्यासाठी आणि कॉपी झेरॉक्स छायांकित प्रत मिळवण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सर्व अटी शर्तींना यावल परीक्षा केंद्र प्रमुख हे आपल्या वैयक्तिक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत आहेत का..? परीक्षा केंद्रावर नियंत्रण कोणाचे..? परीक्षा केंद्रावर कॉपी होत आहे किंवा नाही याचा आढावा कोण घेत आहे..? इत्यादी अनेक प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात उपस्थित केले जात असून शंकरराव चव्हाण मुक्त विद्यापीठ प्रमुख संचालक आणि भरारी पथक यांनी तात्काळ यावल परीक्षा केंद्रास भेट देऊन कारवाई करावी असे शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे.