रावेर तालुक्यातील 33 वर्षीय युवकाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर (रावेर सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रेल्वे लाईन ओलांडत असताना रेल्वे गाडीची जोरात धडक बसल्याने रावेर तालुक्यातील वाघोड(Waghod Taluka Raver Dist Jalgaon) येथील युवकाचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. [ads id="ads1"]  

  मंगळवारी दिनांक 28 मे रोजी रात्री साडे सात वाजेचे सुमारास वाघोड येथील दीपक संतोष महाजन (वय - ३३) हा शौचालयास रेल्वे लाईन ओलांडून गेला होता. परत येत असतांना अप लाईनकडून अचानक आलेल्या रेल्वेची धडक बसल्याने तो बाजूला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ बऱ्हाणपूर (Burhanpur, Madhya Pradesh)येथे नेत असतांना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. रावेर ग्रामीण रुग्णालयात (Raver Rural Hospital) त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.[ads id="ads2"]  

   याबाबत जितेंद्र महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात (Raver Police Station) दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन आमोदकर करीत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!