भुसावळ शहरात गोळीबार ; गोळीबारात दोन जणांचा मृत्यु

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



 भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : भुसावळ शहर (Bhusawal  City) पुन्हा एकदा हादरले आहे. महामार्गावरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांना गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा खून झाला असल्याची माहिती मिळत आहे.[ads id="ads1"]  

भुसावळ शहरातील (Bhusawal City) जुना सातारा पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील (Bhusawal City) खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथं डाक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.[ads id="ads2"]  

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे(Bhusawal City Police Station) पोलिस निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत. दोघ मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय (Jalgaon Civil Hospital) येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!