रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सन्माननीय न्यायाधीश श्री. ए. एच. बाजड साहेब यांचे कोर्टा समोरील फौजदारी खटला. 193/2012 म. शासन ( मूळ फिर्यादी श्री. टी . डी . पाटील, ) विरुद्ध दिपक महाजन वगैरे.फौजदारी खटल्यात दि.03/05/2024 रोजी महत्वपूर्ण निकाल झाला.[ads id="ads1"]
रावेर न्यायालयात आरोपी याचेवर 11 क्विंटल ज्वारी सावखेडा शिवारातील शेतातून चोरीचा गंभीर, स्वरूपाचा गुन्हयातील फौजदारी खटल्याचा निकाल होऊन आरोपी यांना निर्दोष मुक्त करण्यात आले असून आरोपी यांचेवर भा. द. वि. कलम 379,व 34 प्रमाणे नोंदविण्यात आलेल्या गुन्हयातील फौजदारी खटल्यात 7 वर्षानंतर न्याय मिळाला. सदर आरोपी बचाव पक्षा तर्फे श्री. दिपक पी.गाढे वकील विवरे बु.यांनी फौजदारी खटल्याचे कामकाज पहिले.[ads id="ads2"]
तसेच एस. एन. रावेरकर वकील मॅडम यांनी खटल्याकामी सहकार्य केले तर सरकार पक्ष तर्फे श्रीमती.लक्ष्मी तायडे सरकारी वकील यांनी काम पहिले, व त्यांना सहकार्य सह. वकील म्हणून श्री. डी. एच. गाढे वकील यांनी केले.