आवाज परिवर्तनाचा वृत्तपत्राच्या संपादकावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला ; चिनावल परिसरातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal Taluka Raver) येथे "आवाज परिवर्तनाचा" या वृत्तपत्राचे संपादक हे दिनांक 3मे  रोजी भुसावळ (Bhusawal) येथे होणाऱ्या वंचित  बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभे साठी बैठक आटोपून , बैठका घेत असताना रावेर तालुक्यातील चिनावल (Chinawal Taluka Raver) येथील बैठक आटोपून ते  दिनांक 2 मे  रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास  सुझुकी इको एम एच 19 ए एक्स 1430 या चार चाकी वाहनाने [ads id="ads1"]  सावद्याकडे परत येत असताना चिनावल-कोचूर रस्त्यावरील(Chinawal - Kochur Road) स्मशानभूमी जवळ त्यांच्यावर अज्ञात बाईक स्वारांनी जीवघेणा हल्ला केला. अशी फिर्याद जखमी  असलेले आवाज परिवर्तनाचा वृत्तपत्राचे संपादक शिक्षक व वंचित बहुजन आघाडीचे एकनिष्ठ अनोमदर्शी तायडे  यांनी  शुक्रवार दिनांक 3 मे  रोजी सावदा पोलीस ठाण्यात दिली.[ads id="ads2"]  

  ते सध्या जखमी असून त्यांनी  खाजगी रुग्णालयात औषधोपचार घेतले.आता त्यांची परिस्थिती बरी आहे.अज्ञातखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर काही क्षणाताच हल्लेखोर हल्ला करून तत्काळ पसार झाले.एखाद्या वृत्तपत्राच्या संपादक हल्ला करणे हे लोकशाहीला घातक असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वृत्तपत्र जगतातून निषेध व्यक्त होत आहे.आणि त्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून त्यांचेवर कडक कारवाई  करणे सावदा पोलिसांसमोर (Savada Police) मोठे आव्हान आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!