यावल ( सुरेश पाटील ) शहरात आज फालकनगर गंगानगर,तिरुपती नगर इत्यादी विकसित भागात तसेच यावल शहरात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन आपलं मत भाजपाला,रक्षाताईंना मत म्हणजेच मोदींना मत रावेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा रक्षाताई कटिबंध आहेत अशा उद्देशाने प्रचार सुरू असताना यावलकर म्हणतात की आमचं मत भाजपलाच आहे असे म्हणून प्रचार करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना प्रतिसाद दिला आहे. [ads id="ads1"]
आज शुक्रवार दि.३ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून भाजपाचे पदाधिकारी गोपालसिंग पाटील,किशोर कुलकर्णी, पी.एस.सोनवणे सर,बाळू फेगडे,राहुल बारी,कोमल इंगळे गुंजन फेगडे,इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संपूर्ण यावल शहरात घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन प्रसिद्धी पत्रक वाटप करून स्वच्छ प्रशासन... सक्षम सरकार... फिर एक बार मोदी सरकार,[ads id="ads2"]
आपलं मत भाजपा महायुतीला,विकसित भारताच्या संकल्पसाठी एकच पर्याय भारतीय जनता पार्टी आणि महायुती असा प्रचार केला असता यावल शहरातील बहुसंख्य नागरिकांनी सांगितले की आमचा मत भाजपालाच राहील असे सांगून प्रचार करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना सकारात्मकरित्या प्रतिसाद दिला.