सपोनि वाघ, इंगोले नी सावदा पोस्टेतून पाय काढताच अवैध धंदेवाल्यांचे डोके वर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  महामार्गावरील हॉटेलढाब्यांसह अड्ड्यांवर अवैध दारुची विक्री सुरुच

पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क विभाग हतबल झालेय का?     

 सावदा/प्रतिनिधी मुबारक तडवी :     सावदा पोलिस स्टेशनचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,डी.डी.इंगोले यांनी सावदा पोलिस ठाण्यातील कार्यकाळात राबविण्यात आलेली सामुहिक दारुबंदी मोहीम हातभट्टी दारू मुक्त ची गांव मोहीम संकल्पनेची पुनरावृत्ती ची नितांत आवश्यकता असल्याचे जनमाणसांतून बोलले जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता सर्वत्र लागू करण्यात आली आहे शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांकडून आदर्श आचारसंहितेत नियम कायदे यांचे तंतोतंत पालन केले जात आहे मात्र सावदा पोलिस ठाण्याने आदर्श आचारसंहिता चे नियम अटी कायदे धाब्यावर ठेवलेले आहेत?[ads id="ads1"]  

   आचारसंहिता काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सावदा पोलिस स्टेशन प्रशासनाने कार्य अपेक्षित आहे मात्र सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीत अवैध धंदे वाईकांना  जणू काही मोकळीक कच देण्यात आलेली दिसतेय? सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीतील गावांत अवैध धंदे बोकाळले आहे रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील  सावदा रावेर महामार्गावरील सावदा -मोठा वाघोदा दरम्यान अनधिकृत विनापरवाना हॉटेल्स ढाब्यांसह मोठा वाघोदा येथील महामार्गाच्या कडेला च चक्क तीन ठिकाणी अवैध बार अड्डे मध्ये कोणताहि दारु विक्री चा परवाना अथवा परवानगी नसलेले ३ अवैध दारू विक्री चे अड्डे सुरू आहेत मागील कोरोना काळात व तद्नंतर सावदा पोस्टेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, डी.डी इंगोले या दोघही कार्यतत्पर कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी मोठा वाघोदा गावांतील महिलांनी दारुबंदी करण्याची मागणी केली होती त्या महिलांचे मागणीला प्रथम प्राधान्य देत मोठा वाघोद्यात मोठ्या हिमतीने समक्ष येऊन गावठी पन्नी दारु कच्चे रसायने आदी धन नष्ट करीत दारु निर्मिती च्या भट्ट्या उध्वस्त केल्या होत्या व तथाकथित तीन्ही अवैध दारू चे अड्डे बंद पाडले होते.[ads id="ads2"]  

  मात्र  तत्कालीन अधिकार्यांची बदली झाल्याने सपोनि वाघ, इंगोले नी सावदा पोलिस स्टेशन हद्दीतून पाय काढताच अवैध धंदे वाईकांनी डोके वरती काढलेत तरी जिल्हा पोलिस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक भुसावळ उत्पादन शुल्क निरीक्षक यावल मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक यांनी जातीने लक्ष देवून सावदा पोलिस स्टेशनचे हद्दीतील सर्व अनधिकृत विनापरवाना हॉटेल्स ढाब्यांसह मोठा वाघोदा येथील हायवेवर तीन ठिकाणी होत असलेली अवैध दारू विक्री बंद करून पुढील भावीपिढी चे आयुष्य संसार उद्धवस्त होण्यापासून वाचवावे अशी मागणी मोठा वाघोदा वासियांनी केली आहे

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!